spot_img
अहमदनगरसाहेब! बुडतोय तास, विद्यार्थ्यांना मिळेल का एसटी पास? 'श्रीगोंदा बस स्थानकात विद्याथ्यर्थ्यांची...

साहेब! बुडतोय तास, विद्यार्थ्यांना मिळेल का एसटी पास? ‘श्रीगोंदा बस स्थानकात विद्याथ्यर्थ्यांची गर्दी’

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थनिींना त्यांच्या शाळेतच एसटीचे पास देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. त्यासाठी एसटी अधिकाऱ्यांनी नावनोंदणीही केली. मात्र, अजूनही हे पास या विद्यार्थ्यांना मिळालेले नाहीत. शाळेत पास मिळणार की बसस्थानकात, असा संभ्रम विद्याथ्यर्थ्यांमध्ये निर्माण झाला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थी एसटी आगाराचे हेलपाटे मारत आहेत. पास मिळालेला नसल्याने तिकीट काढून त्यांना प्रवास करावा लागत आहे.

श्रीगोंदे तालुक्यातील भागातील विद्यार्थ्यांना अत्यल्प तर मुलींच्या शिक्षणासाठी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून एसटी महामंडळांने सामाजिक बांधिलकी जोपासली. यंदाच्या वर्षापासून विद्यार्थ्यांना एसटीचे पास थेट शाळा-महाविद्यालयात उपलब्ध करून देण्याचा निर्णय ग्रामीण महामंडळाने घेतला होता, परंतु शाळा-महाविद्यालये सुरू होऊन १५ दिवस होत आले, तरी ग्रामीण करून भागातील विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे पास भेटलेले नाहीत.

हे पास कधी मिळणार, याची चर्चा विद्यार्थ्यांची चालू आहे. त्यामुळे उपलब्ध खासगी वाहनांसह एसटीमध्येही एसटी विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळते. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्याध्यर्थ्यांना एसटीकडून सवलतीच्या दरात पास दिले जातात. त्यामुळे कमी पैशात विद्यार्थ्यांना प्रवास करता येतो, परंतु अद्याप एसटी महामंडळाने पास न दिल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे.

शाळांनी राहिलेल्या विद्यार्थ्यांची यादी द्यावी : ढवळे
याबाबत बसआगार व्यवस्थापक संदीप ढवळे यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की शाळेमध्ये जाऊन भेट दिली आहे. शाळेकडून लिस्टची मागणी केली आहे. आजपर्यंत आलेल्या यादीनुसार पास बनवून दिले आहेत. उर्वरित विद्याथ्यांची यादी शाळा-महाविद्यालयांनी तातडीने पाठवल्यास त्यांनाही लवकर पास देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महायुती एकत्र लढणार की स्वबळावर? मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगून टाकले…

मुंबई / नगर सह्याद्री - राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या...

​बुलेटचे ‘फटाके’ फोडणे पडले महागात!; पोलिसांनी काय केले पहा…

​कोतवाली पोलिसांची धडक कारवाई; १० मोटारसायकलींचे सायलेन्सर जप्त, १० हजारांचा दंड वसूल ​अहिल्यानगर / नगर...

सावधान! रस्त्यावर कचरा टाकणे आता पडणार महागात

मनपा दंडात्मक कारवाई करेल ः आमदार संग्राम जगताप | पाईपलाईन रोड परिसरामध्ये राबवले स्वच्छता...

जेवणाचे बिल मागितल्याने हॉटेल चालकाला मारहाण, नगरमध्ये घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मागील जेवणाचे बिल मागितल्याचा रागातून एका ग्राहकाने हॉटेल चालकावर लोखंडी रॉडने...