spot_img
अहमदनगरदोन मंडळांच्या मिरवणुकीत राडा! 'त्या' चौकात घडला प्रकार, कारण आलं समोर..

दोन मंडळांच्या मिरवणुकीत राडा! ‘त्या’ चौकात घडला प्रकार, कारण आलं समोर..

spot_img

Ahmednagar Crime : दोन मंडळांच्या मिरवणुकीत डिजेच्या आवाजाची स्पर्धा, हावभाव अन् इशाऱ्यावरून दोन गट भिडले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत लाठीचार्ज सुरू केल्यानंतर मोठा अनर्थ टळला.

पाथर्डी तालुक्यातील नाथ नगर व वामन भाऊ नगर मधील दोन मंडळांच्या मिरवणुका गणपती विसर्जनासाठी निघाल्या होत्या. नाईक चौकात आल्यावर दोन्ही मंडळांचा सामना रंगला. काही काळ दोन्ही मंडळांचा दणदणाट सुरू होता. आवाजाच्या सर्व मर्यादा ओलांडून डीजेवर तरुणांनी ताल धरला. सुमारे अर्धा किमी लांब असलेल्या कसबा विभागातही डीजेचा आवाज ऐकू येत होता.

डी. जे व लेसर लाईटला परवानगी नसतानाही एका मंडळाकडून डीजेत लेझर लाईटवर कार्यकर्ते बेधुंद नाचत होते. दरम्यान बेभान झालेल्या कार्यकर्त्याला अन्य एका कार्यकर्त्याचा धक्का लागून तो डीजे वरून खाली पडला. जबर जखमी झालेल्या कार्यकर्त्याला पाहण्यासाठी गर्दी जमली. मारहाण झाल्याचे वाटून दोन्ही बाजूकडील कार्यकर्ते परस्परांवर भिडले आणि मारहाण सुरु झाली.

पोलिस स्टेशनमध्ये गणेशोत्सवानिमित्त सत्यनारायण पूजा व महाप्रसाद कार्यक्रमानिमित्त पोलीस, त्यांचे कुटुंबीय व मान्यवर उपस्थित होते. सर्व पोलीस या कार्यक्रमानिम्मित एकत्रित होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लाठीचार्ज सुरू केल्यानंतर मोठा अनर्थ टळला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...