spot_img
महाराष्ट्रधक्कादायक ! विठ्ठलाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा, अधिवेशनात खळबळजनक माहिती समोर

धक्कादायक ! विठ्ठलाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा, अधिवेशनात खळबळजनक माहिती समोर

spot_img

नगरसह्याद्री / नागपूर : पंढरपूर म्हणजे भाविकांचे माहेरघर. विठ्ठल भक्तांसाठी पंढरीचे दर्शन म्हणजे एक पर्वणीच असते. या ठिकाणी विठ्ठलाच्या दर्शनानंतर जो प्रसाद दिला जातो तो भाविक अत्यंत मनोभावे घेत असतात.

पण आता या प्रसादाबाबतच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हा लाडू आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतो, अशी माहिती अहवालातून समोर आली आहे. नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून त्यादरम्यान हा अहवाल सादर करण्यात आला.

नेमकं काय म्हटलं आहे अहवालात?
या अहवालात प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडूबाबत गंभीर मुद्दे समोर आले आहेत. बचत गट ज्या ठिकाणी लाडू बनविण्याचे काम करतात, ती जागा अस्वच्छ आहे. लाडू वाळवण्यासाठी कळकट ताडपत्राचा वापर केला जात असल्याचा उल्लेख आहे.

तसेच २०२०-२१ मध्ये प्रसादाचे लाडू बनविण्याचे कंत्राट संस्थेला देण्यात आले होते त्या संस्थेला लाडू बनविण्याबाबत निकष लावण्यात आले होते.परंतु प्रत्यक्ष तपासणी अहवालात फरक आढळला. लाडूच्या पाकिटात नोंदवलेले घटक प्रत्यक्षात वापरले जात नाहीत.

लाडू बनवण्यासाठी शेंगदाण्याचे तेल वापरण्याची अट करारात नमूद आहे, पण प्रत्यक्षात सरकी तेल वापरले जाते. विठ्ठलाचा प्रसाद म्हणून जे लाडू विकले जातात, त्यांच्या सेवनाने भक्तांच्या आरोग्यास अपाय होऊ शकतो, असा इशारा अहवालात देण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मंत्रिमंडळात धडाकेबाज निर्णय, नगराध्यक्षांना बहुमताने हटवणार; पहा निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्त्वाचे ७ निर्णय...

बीड पुन्हा हादरलं! ग्रामपंचायत सदस्याला संपवल, कोयत्याने सपासप वार

Beed Crime: बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला अवघे काही महिनेच उलटले...

मनपाची ‌‘टांग‌’ अन्‌‍ बसस्थानकाला ‌‘मुडदूस‌’

माळीवाडा बसस्थानकाची व्यथा; मनपा ‌‘ढिम्म‌’| माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी केला संताप व्यक्त अहिल्यानगर ।नगर...

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ‘तो’ निर्णय भोवला; कुस्ती पंच तीन वर्षांसाठी निलंबित

अहिल्यानगरमधील 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत वादग्रस्त निर्णय | राज्य कुस्तीगीर संघाची कारवाई पुणे...