spot_img
ब्रेकिंगPolitics News: शिंदे गटाचा 'मास्टर' प्लॅन! धनुष्यबाण ऐवजी 'या' चिन्हावर लोकसभा लढवणार

Politics News: शिंदे गटाचा ‘मास्टर’ प्लॅन! धनुष्यबाण ऐवजी ‘या’ चिन्हावर लोकसभा लढवणार

spot_img

लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या खासदारांची इच्छा

नागपूर | नगर सह्याद्री-
भाजपचा तिन्ही राज्यासह उत्तरेतील राज्यात उधळलेला विजयाचा वारू लक्षात घेता महाराष्ट्रात शिंदे गटाच्या खासदारांना लोकसभा निवडणुकीत भाजपचे कमळ हवे आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनासाठी जमा झालेल्या राजकीय नेत्यांमध्ये या चर्चेला मोठा जोर आहे.

राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलण्याची शयता आहे. उत्तरेतील तिन्ही राज्यात एकहाती सत्ता मिळवलेल्या भाजपचा आत्मविश्वास दुणावल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नाणे खणखणीत वाजेल, असा जाणकारांचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील खासदारांना शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढण्याऐवजी भाजपच्या कमळ या चिन्हावर लढण्याचे वेध लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हिवाळी अधिवेशन सुरु असलेल्या नागपूरमध्ये या विषयाची जोरदार चर्चा सुरु आहे.

या विषयी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी यावर फारसे बोलणे टाळले. शिंदे गटाच्या खासदारांना कमळाच्या चिन्हावर लढायचे असेल तर तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मला त्यावर चर्चा करायची नाही, असे ते म्हणाले. मात्र, यानिमित्ताने शिंदे गटात सुरु असलेल्या राजकीय खलबतांची उघडपणे चर्चा सुरु झाली आहे. तिन्ही राज्यात भाजपने मोदी यांच्या नावावर निवडणूक लढवली होती.

या राज्यांतील मतदारांनी भाजपच्या कमळ चिन्हाला भरभरुन मते दिल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतही ’कमळा’ची चलती राहण्याची शयता आहे. हीच गोष्ट हेरून शिंदे गटाच्या काही खासदारांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हापेक्षा भाजपचे कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगितले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने अद्याप हा प्रस्ताव मान्य केलेला नाही.

निवडणूक आयोगातील कायदेशीर लढाई आणि बर्‍याच संघर्षानंतर शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले आहे. अशात आता धनुष्यबाण चिन्ह सोडून कमळावर लोकसभा निवडणूक लढवली तर ते टीकेचे धनी होतील. यामुळे निर्माण होणार्‍या सहानुभूतीचा फायदा ठाकरे गटाला मिळू शकतो. तसेच उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह काढून घेण्यासाठी शिंदे गट व भाजपने निवडणूक आयोगात कायदेशीर लढाईचा घाट घातला, असा संदेश मतदारांमध्ये जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.

त्यामुळे शिंदे गटाच्या खासदारांना कमळ चिन्हावर लढू देण्यास, भाजप मान्यता देईल का, हे पाहावे लागेल. शिवसेनेच्या एकूण १८ खासदारांपैकी १३ खासदार शिंदे गटात आहेत. या १३ जागांवर भाजपच्या पाठिंब्याने निवडणूक लढवण्याची शिंदे गटाची रणनीती आहे. मात्र, भाजप शिंदे गटासाठी १३ पैकी १३ जागा सोडण्यास सहजासहजी तयार होणार नाही. त्यामुळे शिंदे गटाच्या खासदारांचा कमळाच्या चिन्हावर लढण्याच्या प्रस्ताव भाजप मान्य करेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...