spot_img
अहमदनगरनगरमध्ये धक्कादायक प्रकार! आजीचा मृतदेह दिवाणमध्ये लपवून ठेवला? लालची नातवाच भाडं फुटलं..

नगरमध्ये धक्कादायक प्रकार! आजीचा मृतदेह दिवाणमध्ये लपवून ठेवला? लालची नातवाच भाडं फुटलं..

spot_img

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:-
९0 वर्षीय वृद्ध आजीच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीचे दागिने काढून घेण्यासाठी नातवाने आजीचा गळा दाबून खुन केल्याची घटना नगर तालुक्यातील अकोळनेर गावच्या शिवारात उघडकीस आली आहे. गोदाबाई लक्ष्मण जाधव (रा. माळवाडी, अकोळनेर, ता. नगर) असे मयत वृद्ध महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी असलेला निलेश बाळासाहेब जाधव (वय २५) याला नगर तालुका पोलिसांनी पकडले असून त्याने दागिने चोरण्यासाठी खुन केल्याची कबुली दिली आहे.

याबाबत मयताचा मुलगा पोपट लक्ष्मण जाधव यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर घटना अकोळनेर शिवारातील भोरवाडी रोडवर असलेल्या माळवाडी येथे शनिवारी (दि.१९) सकाळी ८.१५ ते सायंकाळी घडली असून ती रविवारी (दि.२०) सकाळी ८.३० च्या सुमारास उघडकीस आली आहे. मृतदेह लपवून सोशल मिडीयावर आजी हरविल्याची टाकली पोस्ट आरोपी निलेश जाधव याने शनिवारी सकाळी केंव्हा तरी आजीचा गळा दाबून तिचा खुन केला. त्यानंतर तिच्या कानातील व गळ्यातील सुमारे १ तोळा वजनाचे सोन्याचे दागिने काढून घेतले.

आजीचा मृतदेह दिवाण मध्ये लपवून ठेवला. सायंकाळी सोशल मिडीयावर पोस्ट टाकली की आजी हरवली आहे. कोणाला दिसल्यास संपर्क करावा व पोस्ट मध्ये फोटोखाली संपर्कासाठी त्याचा तसेच कुटुंबातील आणखी दोघांचे मोबाईल नंबर दिले. त्याने रचलेल्या बनावामुळे जाधव कुटुंबातील सदस्यांनी आजीचा परिसरात बऱ्याच ठिकाणी शोध घेतला, मात्र ती सापडली नाही.

रविवारी सकाळी फिर्यादी पोपट जाधव यांना मृतदेह लपवून ठेवलेल्या दिवाण मधून मुंग्या निघत असल्याचे दिसले. त्यांनी मुंग्या कोठून निघतात हे पाहण्यासाठी दिवाण वरील प्लायवूड चे झाकण उघडले असता त्यांना त्यात गोदाबाई यांचा मृतदेह दिसून आला. त्यांनी कुटुंबातील सदस्यांना माहिती देत पोलिसांना फोन केला.ही माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक संपतराव भोसले, स.पो.नि. प्रल्हाद गिते, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे आदींनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. जाधव कुटुंबियांकडे विचारपूस केल्यावर त्यांनी आरोपी निलेश जाधव वर संशय व्यक्त केला.

पोलिसांनी तातडीने हालचाली करत फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पकडले. त्याच्या कडे कसून चौकशी केल्यावर त्याने दागिन्यांसाठी आजीचा गळा दाबून खुन केल्याची कबुली दिली. दुपारी पोपट जाधव यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी निलेश जाधव याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करत त्यास अटक केली. पुढील तपास स.पो.नि. प्रल्हाद गिते हे करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महापालिका वॉर्ड रचनेची प्रतीक्षा संपली; तीन वॉर्डात काय आणि कसे झाले बदल पहा

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता एक हरकत अंशतः मान्य; महानगरपालिकेच्या...

भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय शोकसभेचे आयोजन

अहिल्‍यानगर / नगर सह्याद्री - भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय...

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...