spot_img
महाराष्ट्रधक्कादायक! दोन बाळांचे मृतदेह बॅरेलमध्ये तरंगताना दिसले; कुठे घडली घटना?

धक्कादायक! दोन बाळांचे मृतदेह बॅरेलमध्ये तरंगताना दिसले; कुठे घडली घटना?

spot_img

Maharashtra Crime News: धक्कादायक घटनेनं तालुक्याच जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. एका घरात दोन बाळांचे मृतदेह बॅरेलमध्ये तरंगताना दिसले असून बाळांच्या आईने देखील गळफास घेतला आहे. श्रेया घट्टे, श्रेयस घट्टे अशी या बाळांची नावे असून राधिका घट्टे (२५) मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

अधिक माहिती अशी: धाराशिवमधील तुळजापूर तालुक्यातमधील घट्टेवाडीत सदरची घटना २4 नोव्हेंबरला सायंकाळी उघडकीस आली. प्रथमतः 25 वर्षीय महिला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतर घरातील पाण्याच्या बॅरलमध्ये दोन व पाच महिन्यांची तिची दोन्ही बाळांचे मृतदेह तरंगताना आढळले.

एकाच घरातील तिघांच्या मृत्यूने परिसरात गोंधळाचे वातावरण असून दोन्ही बाळांना मृत अवस्थेत आणि आईस गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत महिलेच्या दिराच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला व दोन्ही बाळांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शेतकऱ्यांना आनंदाची खबर! PM-KISAN योजनेचा हप्ता जमा? पैसे आले की नाही, असे करा चेक..

PM-KISAN: देशातील ९.७ कोटी शेतकऱ्यांसाठी आज एक मोठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान...

नवीन कृषिमंत्र्यांचे वादग्रस्त विधान! महसूल दिनाच्या कार्यक्रमात काय घडलं?

Agriculture Minister Controversy: माणिकराव कोकाटे यांची कमतरता नवीन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अवघ्या २४...

लाडक्या बहि‍णींना रक्षाबंधनाची भेट! जुलैचा हप्ता जमा होणार? आदिती तटकरेंनी सांगितली तारीख

Ladki Bahin Yojana: राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या जीवनात होणार ‘मोठा’ बदल

मुंबई । नगर सह्याद्री– मेष राशी भविष्य आपल्या पालकांकडे दुर्लक्ष करणे हे आपल्या भविष्यातील प्रगतीसाठी मारक...