spot_img
ब्रेकिंगधक्कादायक! नगर शहरात खासगी ट्राफीक शाखा!; पालकमंत्री, आ. जगताप यांच्या नाकावर टिच्चून...

धक्कादायक! नगर शहरात खासगी ट्राफीक शाखा!; पालकमंत्री, आ. जगताप यांच्या नाकावर टिच्चून लाखोंची वसुली!

spot_img

एसपी साहेब, ‘बोरसे’ कडून होतोय तुमच्या नावाचा गैरवापर | ‘तानवडे’सह अनेक खासगी एजंटांमार्फत बोरेसेची वसुली

सारिपाट / शिवाजी शिर्के
अजवड वाहतूक नगर शहरातून सोडणारा आणि त्याद्वारे हप्तेखोरीचे कार्ड दुप्पट करणार्‍या नगर शहर वाहतूक शाखेतील बाबा बोरसेचे हप्तेखोरीचे धाडस आता आणखी वाढले असल्याचे समोर आले आहे. नगर शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम सोडून हप्तेखोरीसाठी या बोरसेने स्वत:च्या मर्जीतील खासगी व्यक्तींची भरती केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रवाशी वाहतूक करणार्‍या रिक्षांसह अन्य वाहने, स्कुल बसेस, स्कुल व्हॅन यासह विविध प्रकारची वाहतूक करणारी परंतू शहरातून धावणारी वाहने याच्या हप्तेखोरीचे कार्ड तयार करणार्‍या बोरसे याने ‘तानवडे’ हा खासगी इसम हप्तेखोरीच्या कलेक्शनसाठी कॅप्टन म्हणून नियुक्त केला असल्याचे आणि त्या तानवडे याने त्याची स्वतंत्र खासगी टीम तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिक्षा, स्कुल बस आणि स्कुल व्हॅन यांच्यासाठी दरमहिन्याला एक हजार रुपये या प्रमाणे पठाणी वसुली करणार्‍या बाबा बोरसे हा दरमहिन्याला किमान ५० लाख रुपयांचे कलेक्शन करत असल्याची चर्चा आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या नावाचा वापर करत त्यांना वाटा द्यावा लागत असल्याचे जाहीरपणे सांगणार्‍या या बाबा बोरसेला खरेच एसपी राकेश ओला यांचे आशीर्वाद आहेत की काय अशी शंका आता नगरकरांना येऊ लागली आहे.

नगर शहराबाहेरुन जाणारा बायपास रस्ता अत्यंत चांगला आणि दर्जेदार झाला असताना आणि शहरातून पुणे, औरंगाबाद, मनमाड, नाशिक, सोलापूरकडे जाणारी वाहतूक या रस्त्याने वळवली असतानाही केवळ आणि केवळ हप्तेखोरीच्या मागे लागलेल्या नगर शहर वाहतूक शाखेतील फौजदार असलेल्या बाबाने शहरात घातल्याचे समोर आले आहे. वाहतूक शाखेचा प्रमुख असणारा हा बाबा गेल्या काही महिन्यात अनेकदा वादग्रस्त ठरलाय! हप्तेखोरीचे कार्ड दुप्पट केल्यानंतर आता हा बाबा नामक आ..का.. नगरकरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारी अवजड वाहतूक शहरातून सुसाट सोडू लागला असल्याचे समोर आले आहे. याबाबत दि. १ जानेवारी २०२५ रोजीच्या अंकात ‘विखे साहेब, ट्राफीकचा आ..का.. आवरा!’ या मथळ्याखाली आम्ही लक्ष वेधले होते. नगरकरांच्या जीवावर उठणारी अवजड वाहतूक आणि त्यातून मिळविला जाणारा मलिदा याबाबतचा सविस्तर सारिपाट आम्ही मांडला होता.

महापालिका हद्दीत नगर शहर वाहतूक शाखेचे कार्यक्षेत्र! मात्र असे असताना शहर वाहतूक शाखेच्या नावाखाली खासगी इसम नियुक्त करुन बोरसे या अधिकार्‍याने संभाजीनगर मार्गावरीेल शेंडी बायपास चौकात खासगी इसमांच्या माध्यमातून दररोजची हप्तेवसुली चालू ठेवली! त्यामाध्यमातून वाहन चालकांच्या खिशावर राजरोस दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याचे काम होत आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्यानंतरही ही वसुली चालूच असल्याने बोरसे याच्या कृष्णकृत्यांना वरिष्ठ अधिकार्‍यांचे पाठबळ असल्याची शंका नगरकरांना येऊ लागली आहे.

ट्राफीक शाखा खासगी दलालांच्या तालावर!
नगर शहर वाहतूक शाखेत नियुक्ती मिळाल्यानंतर बाबा बोरसे या अधिकार्‍याने खासगी इसमांच्या दलालांची टोळी तेथे नियुक्त केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रवाशी वाहतूक करणार्‍या रिक्षावाल्यांकडून वसुली करण्यासाठी खासगी इसम नियुक्त करण्यात आले आहेत. ट्राफीक कर्मचार्‍यांऐवजी हे खासगी इसम थेट बोरसे याच्यासाठी हप्ते जमा करतात! त्यातील काही वाटा त्या खासगी इसमांना दिला जातो आणि बाकी वसुली थेट बोरसे यांच्याकडे सोपविण्यात येते. अत्यंत इमानदारीने हे खासगी इसम काम करत असल्याने व लाचेचा ट्रॅप होण्याचा कोणताही धोका नसल्याने बाबा बोरसे याने ही शक्कल राबवली असल्याची चर्चा आहे.

एसपी साहेब, अशी होतेय ‘तानवडे’च्या टोळीची अन् बोरसेची वसुुली!
स्कुल व्हॅन आणि स्कुल बसेसच्या वसुली साठी बाबा बोरसे याने ‘तानवडे’ची निवड केली. या तानवडेच्या देखील खासगी स्कुल बसेस आणि स्कुल व्हॅन आहेत. त्याच्याकडे कोणत्या शाळेच्या किती बसेस- व्हॅन आहेत याची नोंद आहे. बस- व्हॅन यांनी त्या तानवडेकडे दरमहा हजार रुपये द्यायचे असा अलिखीत नियमच तयार झाला आहे. हजार रुपये महिन्याला न देणार्‍या वाहनाचा नोंदणी क्रमांक बोरसे साहेबांकडे दिला जातो. बोरसे यांच्याकडून लागलीच टेबलवर बसल्या बसल्या त्या वाहन चालकावर नियमभंग केल्याचा गुन्हा दाखल होतो. दहा- पंधरा हजार रुपये दंड आकारणी केल्याचा आणि दंड भरा असा मेसेज त्या वाहन चालकाला त्याच्या मोबाईलवर जातो. दंड कमी करण्याबाबत अथवा स्पष्टीकरण देण्यासाठी संबंधीत वाहन चालक बोरसे यांना भेटला की त्यांच्याकडून ङ्गतानवडे याला भेटाफ, असं फर्मास सुटते! तानवडे नावाचा खासगी इसम मग त्या वाहन चालकाची चारचौघात इज्जत काढतो आणि वसुली करतो. यानंतर दरमहा त्या वाहन चालकाला वसुुलीचा हप्ता द्यावा लागतो.

शहरात वाहतुक शाखेचा राजरोस दरोडा; तरीही आ. संग्राम जगताप गप्प का?
नगर शहरातील सामान्य रिक्षा चालक, स्कुल बस  आणि स्कुल व्हॅनसह अन्य प्रवाशी वाहतुकीसह माल वाहतुक करणार्‍या वाहन चालकांकडून दररोज दिवसाढवळ्या लाखो रुपयांची वसुली होत असताना या बाबा बोरसेवर नक्की कोणाची मेहेरबानी आहे याचे कोडे अनेकांना पडले आहे. विशेषत: शहरात कोणत्याही अवैध व्यवसायांसह नागरिकांची पिळवणुक करणार्‍या, अडवणूक करणार्‍यांच्या विरोधात थेटपणे रस्त्यावर येत जाब विचारणारे आ. संग्राम जगताप यांच्याच शहरात या वाहतुक शाखेचा बाबा बोरसे इतका मोकाट सुटला असताना त्याला आवर घालण्याचे आणि त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्याचे काम आ. संग्राम जगताप यांनी करावे अशी मागणी नगर शहरातील रिक्षा चालकांसह स्कुल बस- व्हॅन चालकांनी केली आहे. आता याबाबत आ. जगताप काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे.

पालकमंत्री साहेब अन् एसपी साहेब तुम्हीच करा
हप्तेखोरीची नगर शहरातील बोरसेची आकडेमोड
नगर शहरात प्रवाशी वाहतूक करणार्‍या किमान चार हजार रिक्षा आहेत. त्यांच्याकडून हजार रुपये प्रति महिना वसुली केली जात असल्याची चर्चा आहे. त्यावर विश्वास न ठेवता पाचशे रुपये असा आकडा गृहीत धरु! चार हजार रिक्षांचा विचार केल्यास पाचशे रिक्षांचे प्रति महिना वीस लाख रुपये होतात! स्कुल बस आणि स्कुल व्हॅन यांची नगर शहरातील संख्या दोन हजारच्या आसपास आहे. त्यांच्याकडून ‘तानवडे’ टोळीच्या माध्यमातून प्रति महिना एक हजार रुपये वसुली कली जाते. दोन हजार बस- व्हॅनचा विचार केला तर प्रति महिना वीस लाख रुपये वसुल होतात. प्रवाशी वाहतूक करणार्‍या आराम बस, ट्रॅव्हल्स यांची नगर शहरातील संख्या किमान दोनशे आणि पुणे- संभाजीनगर इकडे नगर शहरातून जाणार्‍या बसेसची संख्या किमान पाचशे! त्यांच्याकडून प्रति महिना हजार रुपये वसुल केेले जातात. सातशे बसेसचा विचार करता एक हजार रुपये या प्रमाणे त्यांची वसुली होते. सात लाख रुपये प्रति महिना! पालकमंत्री विखे पाटलांसह एसपी साहेब यांनी याची आकडेमोड करत बेरीज केली तर महिन्याला होणारे कलेक्शन डोळे फाटणारे आहे. पन्नास लाखाची वसुली करणार्‍या बाबा बोरसे याच्यावर कारवाई झाली नाही तर त्याच्या या हप्तेखोरीतील वाटा तुम्हाला मिळत असावा अशी शंका नगरकरांना येण्याआधी बोरसेला मुख्यालयाचा रस्ता दाखवून त्याची खात्यांतर्गत चौकशी करण्याची मागणी नगर बचाव समितीने केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आयुक्त साहेब, चमकोगिरी नको फिल्डवर काम दाखवा; कोतकर काय म्हणाले पहा…

मनोज कोतकर | मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट | आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर शहरात भटया...

कापडबाजारातील अतिक्रमण हटवा; अहिल्यानगर हिंदू समाज आक्रमक, दिला ‘हा’ इशारा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - कापड बाजार, घास गल्ली, मोची गल्लीतील अतिक्रमण तातडीने हटविण्यासाठी...

Breaking News : महिलांना २१०० रूपये देण्याच्या घोषणेवर न्यायालयाने दिला नकार; सांगितलं कि….

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी राष्ट्रीय राजधानीतील महिलांना दरमहा २,१०० रुपये...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत मोठी अपडेट, कारण आले समोर…

मुंबई / नगर सह्याद्री - स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट...