spot_img
अहमदनगरकापडबाजारातील अतिक्रमण हटवा; अहिल्यानगर हिंदू समाज आक्रमक, दिला 'हा' इशारा

कापडबाजारातील अतिक्रमण हटवा; अहिल्यानगर हिंदू समाज आक्रमक, दिला ‘हा’ इशारा

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
कापड बाजार, घास गल्ली, मोची गल्लीतील अतिक्रमण तातडीने हटविण्यासाठी अहिल्यानगर हिंदू समाजाचावतीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अतिक्रमण हटविण्याबाबत हिंदू समाजाच्यावतीने महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आले आहे.

अहिल्यानगरमधील कापड बाजार, गंज बाजार, घास गल्ली आणि मोची गल्ली या ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण करुन दुकाने थाटली आहेत. फेरीवाल्यांनी दुकाने थाटल्यामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेचा आणि महिलांची छेडछाडीच्या घटना घडत आहेत.

कापड बाजारातील अतिक्रमणांकडे महापालिका कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे. या अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सोमवारी हिंदू समाजाच्या वतीने याबाबत महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात घास गल्ली, मोची गल्ली, आणि गंज बाजार या भागातील अनधिकृत अतिक्रमण तातडीने व कायमस्वरूपी हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, असुरक्षितता आणि गैरसोयी वाढल्या आहेत. यावर तातडीने कारवाई न केल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. प्रशासनाने या समस्येवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी अहिल्यानगर हिंदू समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा; वादग्रस्त मोहोळ विरुद्ध राक्षे लढतीची चौकशी होणार

योगेश दोडके यांची माहिती / प्रा.विलास कथुरे यांची प्रमुखपदी नियुक्ती अहिल्यानगर / नगर सह्याद्री : अहिल्यानगरमध्ये...

तब्बल १९ बोगस कंपन्यांमधून कोट्यवधी लुटले; मोबाईल चालू तरी पोलिसांना सापडेना संदीप अन् त्याची टोळी…

 पोलीस अधिकार्‍यांच्या भूमिकाच संशयास्पद स्पेशल रिपोर्ट / शिवाजी शिर्के - सह्याद्री मल्टीनिधी ही कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत...

शनिशिंगणापूर देवस्थानचा मोठा निर्णय; शनिदेवाला ब्रँडेड तेलानेच करावा लागेल अभिषेक!

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एक मार्च २०२५ पासून...

‘सुपा, पारनेर, बेलवंडीत दरोडा टाकणारे जेरबंद’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- सुपा, पारनेर, बेलवंडीत परिसरात घरफोडी करणारे अट्टल दरोडेखोरांना, स्थानिक गुन्हे...