spot_img
ब्रेकिंगधक्कादायक! 'लाडकी बहीण योजने'साठी पैसे उकळले; महिलांनी तहसीलदारसमोर गाऱ्हाणे मांडलं, पुढे घडलं...

धक्कादायक! ‘लाडकी बहीण योजने’साठी पैसे उकळले; महिलांनी तहसीलदारसमोर गाऱ्हाणे मांडलं, पुढे घडलं असं काही..

spot_img

Ladki Bahin Yojana: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या मंजुरीसाठी दलाली करणाऱ्या एका महिलेवर करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलं होतं की, अधिकाऱ्यांच्या नावे पैसे घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. त्यानुसार, लाडकी बहीण योजनेसाठी बहिणींची आर्थिक लूट केल्याच्या आरोपावरून हा राज्यातील पहिला गुन्हा दाखल झालाय.

लाडकी बहीण योजनेसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मंजूर करून देण्यासाठी निराधार आणि गरीब महिलांकडून पैसे उकळल्याचं समोर आलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वंदना म्हस्के नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

वंदना म्हस्के गरीब महिलांना लुटत असल्याचं काही महिलांनी तहसीलदारसमोर गाऱ्हाणे मांडलं. त्यानंतर तहसीलदारांनी महिलांचे जबाब घेत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार गुन्हा दाखल झालाय.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...