न्यायालयीन चौकशीचा अहवाल समोर
मुंबई / नगर सह्याद्री –
बदलापुरातील दोन शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात ५ पोलिसांना जबाबदार ठरवण्यात आले आहे. न्यायालयीन चौकशीचा अहवाल आज मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला. या अहवालामध्ये अक्षयच्या हत्येला पोलिसच जबाबदार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अक्षय शिंदे एन्काऊंटरला पोलिसच जबाबदार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. न्यायालयीन चोकशीचा अहवाल मुंबई हायकोर्टात आज सादर करण्यात आला आहे. अक्षय शिंदेच्या मृत्यूला ५ पोलिस जाबदार असल्याचे या अहवालामध्ये नमूद केले आहे. आत्मसंरक्षणासाठी गोळ्या चालवल्या होत्या असा दावा पोलिसांनी केला होता. पण पोलिसांचा हा दावा संशयास्पद असल्याचे देखील यामध्ये म्हटले आहे.
न्यायालयीन चौकशी अहवालामध्ये असे नमूद करण्यात आला आहे की, पोलिसांनी अक्षय शिंदेविरुद्ध केलेला बळाचा वापर अनुचित आहे. अक्षयने बंदुक हिसकावली असे पोलिस म्हणतात. पण बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसेच नव्हते. आत्मसंरक्षणासाठी गोळ्या चालवल्या होत्या हा पोलिसांचा दावा संशयास्पद आहे. न्यायालयीन चौकशी समतिच्या अहवालामध्ये अक्षय शिंदेच्या मृत्यूला ५ पोलिसांनाच जबाबदार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ५ पोलिस अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी खटला लावला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अक्षय शिंदे हा बदलापूरमधील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी होता. याप्रकरणात अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. दुसऱ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून ठाण्यात आणले जात होते. तेव्हा मुंब्रा बायपासजवळ त्याचे एन्काऊंटर झाले होते. अक्षयच्या एन्काऊंटरनंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्याचा एन्काऊंटर फेक असल्याचा आरोप करण्यात आला होता.