spot_img
अहमदनगरधक्कादायक! राष्ट्रवादीच्या नेत्याच्या घरासमोर अमावस्येच्या दिवशी अघोरी पूजा, लिंबू, बाहुल्या अन्….

धक्कादायक! राष्ट्रवादीच्या नेत्याच्या घरासमोर अमावस्येच्या दिवशी अघोरी पूजा, लिंबू, बाहुल्या अन्….

spot_img

Maharashtra Crime News: अघोरी प्रकार घडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पुण्याचे माजी महापौर दत्ता धनकवडे यांच्या बंगल्यासमोर हा प्रकार घडला असून, त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. घटना २९ मार्च रोजी अमावस्येच्या दिवशी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील धनकवडी परिसरात घडली. याच परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे दत्ता धनकवडे राहतात.

त्यांच्या बंगल्याच्या समोरच्या बाजूस काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या. या वस्तूंमध्ये नारळ, दहीभात, उकडलेली अंडी, लिंबू आणि काळा बुक्का किंवा अगीर यांसारख्या साहित्याचा समावेश होता, जे सामान्यतः काळ्या जादूच्या किंवा अघोरी विधींसाठी वापरले जात असल्याचे म्हटले जाते. एका प्रमुख राजकीय नेत्याच्या घरासमोर अशा प्रकारे जादूटोण्याचे साहित्य आढळून आल्याने परिसरात चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.

हा प्रकार स्थानिक लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ पाहणी केली असता, धानका काकासाहेब चव्हाण नावाची एक महिला तिथे हे कृत्य करत असल्याचे त्यांना आढळले. उपस्थितांनी तिला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. प्राथमिक माहितीत असेही समोर आले आहे की, ही महिला गेल्या चार महिन्यांपासून अमावस्येच्या दिवशी धनकवडी परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी, लोकांच्या घरांसमोर अशाच प्रकारे अघोरी विधी करत होती.

पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेतले असून, तिची कसून चौकशी सुरू केली आहे. तिने हे कृत्य का केले? यामागे तिचा नेमका उद्देश काय होता? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे कृत्य करण्यासाठी तिला कोणी सांगितले होते का?. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. या चौकशीतून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेने सुसंस्कृत आणि आधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात अघोरी प्रकारांचे अस्तित्व अजूनही आहे का, हा प्रश्न निर्माण केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...

मुख्याध्यापक लंके यांची बदली रद्द करा; रयतच्या कार्यालयासमोर पालकांचे धरणे आंदोलन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विभागाचे कार्यरत मुख्याध्यापक...