अहमदनगर । नगर सहयाद्री
हॉस्पिटल बांधण्यासाठी माहेरून २० लाख रूपये आणावे म्हणून विवाहितेचा सासरी छळ करण्यात आला. सध्या भिंगारमध्ये राहत असलेल्या पीडित विवाहितेने याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह चौघांविरुध्द गुन्हादाखल करण्यात आला आहे.
पती गिरीष शंकर काळे, भाया मुकेश शंकर काळे, जाव दीपाली मुकेश काळे (तिघे रा. दाह बुद्रुक, ता. राहाता) मनीषा संतोष मंडलिक (रा. लांडेवाडी, भीमाशंकर रस्ता, मंचर, ता. आआंबेगाव) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
सदरची घटना २ मार्च २०१३ ते २८ नोव्हेंबर २०२२ दरम्यान फिर्यादी सासरी दाव बुद्रुक येथे नांदत असताना घडली असून गुन्हा २५ एप्रिल २०२४ रोजी दाखल झाला आहे.
फिर्यादी सासरी नांदत असताना तिच्या पतीसह चौघांनी वेळोवेळी पत्नीला हॉस्पिटल बांधण्यासाठी माहेरून २० लाख रुपये आणण्यास सांगितले, पैसे घेऊन येण्यासाठी फिर्यादीला शिवीगाळ, मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला व घरातून हाकलून दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.