मुंबई। नगर सहयाद्री-
एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासून हवामानात सातत्याने बदल घडत आहे. रखरखत्या उन्हाचा पारा पुन्हा चाळीशीपार गेला आहे. तर राज्याच्या विविध भागात अवकळी पावसाची जोरदार हजेरी सूरु आहे. त्यातच हवामान खात्याने मुंबई, ठाण्यासह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबई आणि ठाण्यासह कोकणात आजपासून उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. यामुळे मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधील काही भागांमध्ये तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं आजपासून पुढच्या तीन दिवसांत मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांनाही कडक उन्हाच्या झळांना सामोरे जावे लागणार आहे.
ज्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामान होत असून नांदेड, परभणी, जालना, अमरावती, वर्धा जिल्ह्यांत वादळी पावसाने तडाखा दिला. आता आज मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, धाराशीव, लातूर, आणि विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा यलो अलर्ट देण्यात आला आहे.