पुणे | नगर सह्याद्री
Breaking News : जेवणातून ५५० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती पुढे यात असून उलट्या जुलाब होत असणाऱ्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
जेईई आणि आयआयटी परिक्षेची पुर्वतयारी करणार्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार खेड तालुयातून समोर आला आहे. खेड तालुयाच्या कडूस येथील दक्षणा फाऊंडेशनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून २५ विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कडुस येथील दक्षणा फाऊंडेशनमध्ये देशातील विविध राज्यातून जेईई आणि आआयटी अशा विविध पूर्वपरीक्षांच्या तयारी अभ्यासक्रमासाठी निवासी आहेत. शुक्रवारी रात्री बटाटा भाजी चपाती, डाळ भात असा जेवनाचा मेन्यू होता. ज्यातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. काल रात्री ५५० विद्यार्थ्यांनी हे जेवन केले होते. ज्यामधील २५ विद्यार्थ्यांना जुलाब, उलटीचा त्रास जाणवू लागला. विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर राजगुरुनगर पोलिसांसह डॉटरांची टिम चांडोली ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली आहे. काही मुलांना ऑसिजन लावण्यात आले असून ३ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. विषबाधा झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.