spot_img
ब्रेकिंगराज ठाकरे यांना धक्का! वसंत मोरे यांची मनसेला सोडचिठ्ठी

राज ठाकरे यांना धक्का! वसंत मोरे यांची मनसेला सोडचिठ्ठी

spot_img

पुणे। नगर सहयाद्री
पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेले माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकला आहे. अखेरचा जय महाराष्ट्र… साहेब मला माफ करा अशी फेसबुक पोस्ट लिहित वसंत मोरे यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. राज ठाकरेंच्या तसवीरीसमोर लोटांगण घातल्याचा फोटो मोरेंनी शेअर केला आहे. वसंत मोरेंनी पक्ष सोडण्याचा निर्णय हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मोरे आता कोणत्या पक्षाची वाट धरणार, याची उत्सुकता आहे. वसंत मोरे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शयता आहे.

एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो… त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो असं लिहिलेली एक इमेज वसंत मोरे यांनी फेसबुकवर शेअर केली होती. सोमवारी रात्री ११ वाजून ५६ मिनिटांनी तात्यांनी ही पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे इतया रात्री मोरे कुठल्या विवंचनेत होते, याची काळजी समर्थकांना लागून राहिली होती. अखेर मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास वसंत मोरेंनी फेसबुक पोस्ट लिहित निर्णय जाहीर केला.

याआधी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी काढलेल्या मोर्चात मोरे अनुपस्थित असल्याचं अमित ठाकरेंना वाटलं होतं. त्यावेळी वसंत मोरेंवर अमित ठाकरेंना पुरावा देत पटवून देण्याची वेळ आली होती.

अमित साहेब तुमच्यासाठी काही पण… फक्त मला समजून घ्या. साहेब, मी काम करणारा आहे, नुसता मिरवणारा नाही. त्यामुळे कदाचित गर्दीत तुम्हाला मी दिसलो नसेन, असं वसंत मोरे म्हणाले होते. त्यापूर्वी, कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतातच, पण मी पट्टीचा गारुडी आहे अशा आशयाचं व्हॉट्सअप स्टेटस वसंत मोरे यांनी ठेवल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मनसे नेते साईनाथ बाबर यांच्या खासदारकीचे संकेत दिले असल्यामुळे मोरेंनी कोणाला उद्देशून स्टेटस ठेवलं, अशी चर्चा त्यावेळीही रंगली होती.

काय म्हणाले वसंत मोरे?
“गेली २५ वर्ष शिवसेनेमध्ये राज ठाकरेंसोबत काम केलं. राज ठाकरेंसोबत करियर केलं. आज मनसेच्या सर्व पदांचा राजनामा दिला आहे. मी लोकसभा लढवण्यास इच्छुक आहे म्हणल्यानंतर मनसेमधील पुण्यातील यादी वाढत गेली. मनसेची पुण्यातील परिस्थिती नाजूक आहे. मनसे लोकसभा लढू शकत नाही, माझ्यावर अन्याय झाला, मग माझा कडेलोट झाला…” असे वसंत मोरे यावेळी म्हणाले.

“माझा वाद राज ठाकरे यांच्याशी नाही. मनसेशी नाही. चुकीच्या लोकांच्या हाती शहर दिले. मला अनेकजण थांबवत होते. माझ्या कार्यकर्त्यांवर कारवाया होत होत्या. राज ठाकरे यांच्या मनातलं नाव हटवण्याचे काम कोअर कमिटीने केलं आहे. पक्षाचे वातावरण शहरात चांगले असताना इथले पदाधिकारी निगेटिव्ह आहेत, मी मनसेकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही, आता बाकी इच्छुक असणाऱ्यांना उमेदवारी द्यावी…” असे वसंत मोरे म्हणाले.

“साहेब मुंबईला असतात. पुण्यातील अनेक कार्यक्रमात मला डावलले जातं. मी पक्षात दहशतवादी आहे का? माझ्याबरोबर अनेक जण उभे राहायला घाबरतात. मला ऑफर्स खूप आहेत, कुठे जाणार हे भविष्यात कळेल येणाऱ्या दोन दिवसात भूमिका स्पष्ट करेल,” असे महत्वाचे विधान ही वसंत मोरे यांनी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...