spot_img
ब्रेकिंगराष्ट्रवादीला धक्का! जयंत पाटील-प्राजक्त तनपुरे वेगळ्या निर्णयाच्या तयारीत? कसे ते पहा...

राष्ट्रवादीला धक्का! जयंत पाटील-प्राजक्त तनपुरे वेगळ्या निर्णयाच्या तयारीत? कसे ते पहा…

spot_img

पुणे / नगर सह्याद्री –
मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काल मंगळवार १० जून रोजी २६ वा वर्धापन दिन दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. दोन्ही ठिकाणी पक्षातील नेत्यांसह पक्ष प्रमुखांनी जोरदार भाषणे केली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर थेट प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली.

त्यामुळे जयंत पाटील वेगळा निर्णय घेणार असल्याच्या चर्चांना पेव फुटले. तर दुसरीकडे जयंत पाटील यांचे भाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला दांडी मारल्याने मामा-भाचे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचा चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाल्या आहेत.

जयंत पाटील यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष पदावर मुक्त करण्याची इच्छा शरद पवार यांच्याकडे व्यक्त करत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे भाष्य केले होते. त्यांचे भाषण सुरू असताना नगर राहुरी मतदार संघाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे उपस्थित नव्हते. त्यामुळे तनपुरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधान आले आहे.

काही दिवसांपूर्वीच प्राजक्त तनपुरे यांना राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत विखे कुटुंबाने आतून मदत केली, असे सांगितले जात आहे. तसेच राजकारणात सगळेच पत्ते उघडून दाखवायचे नसतात, असे एका मुलाखती दरम्यान तनपुरे यांनी केलेले विधान आगामी राजकीय वाटचालीचे संकेत सांगून जात आहे.

जयंत पाटील काय म्हणाले?
मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांसमोर साहेबांना विनंती करेन की, नवीन लोकांना संधी द्यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे बोलताना केली. शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

करिश्मा कपूरवर दुःखाचा डोंगर; पतीचे हार्ट अटॅकमुळे निधन

मुंबई । नगर सहयाद्री बॉलिवूडमधून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री करिश्मा...

चांदणी चौकात भीषण अपघात! अंगावर काटा आणणारं दृश्य; ब्रेक दाबताच कंटेनर…

Accident News:चांदणी चौकात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून, एका कंटेनर ट्रकला मोठा...

अहिल्यानगर वादळी वाऱ्याने हादरलं! शेतावरून परताना काळाने घात केला; एका वृद्ध महिलेचा मृत्यू

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात बुधवार (दि. ११ जून) सायंकाळी आलेल्या...

आजचे राशी भविष्य जरा गडबड करणार? ‘या’ राशीच्या लोकांनी सांभाळून रहा…

मुंबई। नगर सहयाद्री मेष राशी भविष्य अनपेक्षितपणे प्रवास करावा लागल्यामुळे दमून जाल. तेलाने मसाज करून शरीराच्या...