spot_img
ब्रेकिंगअजित पवार गटाला धक्का? शहरात ६०० जणांचे धडाधड राजीनामे; वारं फिरलं..

अजित पवार गटाला धक्का? शहरात ६०० जणांचे धडाधड राजीनामे; वारं फिरलं..

spot_img

Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील जनतेचे लक्ष महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांकडे लागले होते. अखेर काल राज्यातील विधानसभा निवडणुकीची प्रतीक्षा संपली असून विधानसभा निवडणुकीसाठी २० नोहेंबरला मतदान होण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीमधील राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला एक धक्का बसला आहे. पुण्यातील तब्बल ६०० कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे.

एकीकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते तसेच पदाधिकारी हे शरद पवार यांची तुतारी हातात घेत आहेत. तर दुसरीकडे राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांची वर्णी न लागल्याने शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते नाराज झाले आहे.

मंगळवारी रात्री पुणे शहर कार्यालयात कार्यकर्तयांनी गोंधळ घातला. शहरातील सर्वच पदाधिकारी हे सामूहिक राजीनामा देण्याचा तयारीत होते. अखेर तब्बल 600 जणांनी आपल्या पदाचा राजीनमा देत नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीमधील राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला एक धक्का बसला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्याला गोळ्या घाला…; निंबळक बायपास चौकात रास्तारोको

हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने ग्रामस्थांचा निंबळक बायपास चौकात रास्तारोको अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गेल्या...

आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती; ‘महापालिका निवडणुकीसाठी आघाडी’; किरण काळे यांनी दिली मोठी माहिती..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम...

चुलत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पुतण्यावर धारदार शस्त्राने सपासप हल्ला, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- माझ्या शेतातील लाकडे का आणली? असा जाब विचारत एका तरुणाला...

शिवसेनेला भाजपचा झटका; ‘बड्या’ नेत्याचा भाजपत प्रवेश!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अहिल्यानगर शहरातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली...