spot_img
अहमदनगरशिवाजी कर्डिले पळपुटे! - तनपुरे ; समोरासमोर चर्चा करण्याचे दिले आव्हान

शिवाजी कर्डिले पळपुटे! – तनपुरे ; समोरासमोर चर्चा करण्याचे दिले आव्हान

spot_img

राहुरी / नगर सह्याद्री

आ. तनपुरेंवर प्राजक्त निष्क्रियतेचा आरोप केल्यानंतर समोरा समोर येऊन चर्चा करा, केलेली विकास कामे दाखवून देतो, असे थेट आव्हान आ. तनपुरे यांनी कर्डिलेंना दिले होते. परंतु आव्हान न स्विकारता केवळ खोट्या भुलथापा व आरोप करण्यात तरबेज असणाऱ्या कर्डिलेंचा खरा चेहरा समोर आला आहे. आव्हानापासून पळ काढणाऱ्या कर्डिलेंच्या पराभवासाठी जनसामन्यांनीच निवडणूक हाती घेतल्याचे राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी सांगितले.

राहुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये मतदारांशी संवाद साधताना तनपुरे बोलत होते. याप्रसंग उपसभापती बाळासाहेब खुळे, संचालक रामदास बाचकर, महेश पानसरे, भाऊसाहेब खेवरे, सुभाष डुक्रे, मंगेश गाडे, मारुती हारदे, मधुकर पवार, चंद्रकांत पानसंबळ आदींची उपस्थिती होती.

तनपुरे म्हणाले की, एकीकडे कर्डिले निष्क्रियतेचा आरोप करतात आणि दुसरीकडे मीच विकासदूत असल्याचे सांगतात. तब्बल १० वर्ष राहुरीत आमदारकी मिरवल्यानंतरही कर्डिलेंना आपल्या काळातील एकही काम सांगता येईना, असेही सुनावले.

हा आहे तनपुरेंच्या कामांचा लेखाजोखा!
आ. तनपुरे यांनी निळवंडेच्या कालव्यांसाठी १२५० कोटी, रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे १४० कोटी, १० नविन सबस्टेशन, ४०० वीज रोहित्र, जलजीवन मिशन पाणी योजनेअंतर्गत मतदार संघातील ५८ गावांना निधी मिळवून दिला. वांबोरी चारीच्या माध्यमातून ५ वर्ष शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळवून दिले. याशिवाय मतदार संघातील प्रश्नांची जाण व प्रत्येकाचा आपुलकीने सन्मान ठेवणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी ओळख बनविल्याचेही अरुण तनपुरे म्हणाले.

राहुरीला सुसंस्कृत वारसा : खुळे
लोकप्रतिनिधी गुन्हेगार असला की मतदार संघात गुन्हेगारी वाढते. २०१९ पूर्वी वेळोवेळी पोलिस ठाण्यावर मोर्चे काढत राहुरीत वाढलेल्या गुन्हेगारीबाबत दाद मागावी लागत होती. परंतु लोकप्रतिनिधी विकासात्मक असल्यास विकास कामांबाबतच मतदार संघ अग्रेसर राहतो. त्यामुळे सुसंस्कृत, उच्चशिक्षित व गुन्हेगारीबाबत निष्कलंक असलेल्या आ. तनपुरेंना राहुरी मतदार संघ मोठे मताधिक्य देणारच असल्याचा दावा उपसभापती बाळासाहेब खुळे यांनी केला.

नात्यांचा वापर गुन्हे मिटविण्यासाठी केला नाही
प्राजक्त तनपुरे हे मामा जयंत पाटील यांचा राजकीय आसरा घेतात असा आरोप विरोधी उमेदवार कर्डिले यांनी केला. त्यांवर संचालक रामदास बाचकर म्हणाले, काहींनी आपल्यावरील दाखल असलेल्या गुन्ह्यातून सुटका व्हावी, जेलमध्ये जाण्याची वेळ येऊ नये म्हणून राजकीय नातलगांचा आधार घेतला. परंतु आ. तनपुरे यांनी गुन्हेगारीसाठी नव्हे तर सदैव जनहितासाठीच मामांचे सहकार्य घेतल्याचे सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार! एका कारणामुळं शिक्षिकेची पदोन्नती रद्द; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका महिला...

पारनेर तालुक्यात पिकांचा बनावट पंचनामा; सखोल चौकशीची मागणी

पिंपरी पठार, वेसदऱ्यात लाभार्थ्यांची बोगस यादी: सरपंच शिंदे पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील पिंपरी...

राज-उद्धव ठाकरेंच्या युतीचं अखेर ठरलं, जागावाटपाबाबत मोठी माहिती समोर!

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मनसेचे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात...

सरपंच संजय रोकडे यांची आक्रमक भूमिका; ग्रामस्थांसह ‘या’ कामांसाठी करणार उपोषण..

पारनेर । नगर सहयाद्री:- वडगाव सावताळ ते गाजदिपूर या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी...