spot_img
अहमदनगरनगरचे शिवसैनिक आक्रमक! गायक कुणाल कामराच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, कोण काय म्हणाले...

नगरचे शिवसैनिक आक्रमक! गायक कुणाल कामराच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, कोण काय म्हणाले वाचा…

spot_img

अहिल्यानगर । नगर सह्यद्री:-
महाराष्ट्रातील जनतेने 2024 साली कोण गद्दार व कोण खुद्दार आहे, हे दाखवुन दिलेले आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा कोणाकडे गेला आहे, हे जनतेने ठरवलेल आहे. गायक कुणाल कामरा यानी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह कवितेच्या माध्यमातून जे अपशब्द वापरले ते राज्यातील जनतेला आवडले नाही. त्यांचा निषेध म्हणून आज अहिल्यानगर शिवसेनेच्या वतीने कुणाल कामराचा पुतळा दहन करुन निषेध व्यक्त केला. उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्द बोलणार्‍यांना जसाच तसे उत्तर दिले जाईल, असे प्रतिपादन शहरप्रमुख सचिन जाधव यांनी केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्द वापरुन आक्षेपार्ह कविता तयार करणार्‍या गायक कुणाल कामरा याचा अहिल्यानगर शिवसेनेच्या वतीने प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारुन दिल्लीगेट वेस येथे दहन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, संपर्क प्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, संजय शेंडगे, गणेश कवडे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, दत्ता कावरे, प्रशांत गायकवाड, संतोष गेनप्पा, दिपक खैरे, काका शेळके, संदिप दातरंगे, प्रविण भोसले, अण्णा घोलप, अरुण झेंडे, अभिजित अष्टेकर, रमेश खेडकर, सलोनी शिंदे, सुनिता बहुले, सागर थोरात, अभि दहिहंडे, पोपट पाथरे, अक्षय भिंगारे, दामोदर भालसिंग आदिंसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा प्रमुख अनिल शिंदे म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह कविता तयार केले आहे. उपमुख्यमंत्री ना. शिंदे हे महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे नेते आहे. मुख्यमंत्री असतांना त्यांनी अनेक लोक कणाल्याकारी कार्य केले असून त्यांच्या विरोधात असे कविता तयार करणे योग्य नाही. गायक कुणाल कामरा यांचा शिवसेना स्टाईलने बंदोबस्त करुन महाराष्ट्रात त्याला फिरु देणार नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्री यांचा असा प्रकारे अपमान करणे विरोधांना शोभणारे नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलतांना म्हणाले की, संभाजी कदम म्हणाले की, महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह कविता तयार करणारे गायक कुणाल कामरा याने माफी मागवी. तुम्ही कॉमेडी अवश्य करा, पण त्याद्वारे कुणी अपमानित करण्याचे काम करत असेल तर हे सहन केले जाणार नाही, असे म्हणाले,

संपर्क प्रमुख दिलीप सातपुते म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गायक कुणाल कामरा याने हिनदर्जाचे कविता केली. गायक कुणाल कामराचा महाराष्ट्रात कुठेही कार्यक्रम होऊ दिला जाणार नाही. गायक कामरा यास जिथे दिसेल तिथे काळे फासले जाईल, असे सांगितले. ज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्द वापरुन आक्षेपार्ह कविता तयार करणार्‍या गायक कुणाल कामरा याचा अहिल्यानगर शिवसेनेच्या वतीने प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारुन दिल्लीगेट वेस येथे दहन करण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

इंजेक्शन जीवावर बेतलं, दोन चिमुरड्यांचा मृत्यू!; ‘या’ हॉस्पिटलमध्ये घडला प्रकार

Butox Injection Death: एका हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली...

राष्ट्रवादीची ताकद वाढणार; ‘या’ ४ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार?

Politics News: सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत. जिल्ह्यातील चार माजी आमदार...

अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार; महिलेच्या बंगल्यावर दरोडा

अकोले | नगर सह्याद्री अकोले शहरातील परवानाधारक देशी दारू विक्रेत्या काशीबाई म्हतारबा डोंगरे (रा.देवठाण रोड...

‘मळगंगा देवीच्या घागर दर्शनासाठी लोटला जनसागर’

निघोज | नगर सह्याद्री राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रेसाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता....