spot_img
ब्रेकिंगमुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे यांची माघार?; केंद्रात मंत्री होणार..

मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे यांची माघार?; केंद्रात मंत्री होणार..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
महायुतीला मिळालेल्या निर्विवाद यशानंतर गेले दोन दिवस मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असली तरी सोमवारी मध्यरात्रीपासून एकूणच सूर बदल्याचे चित्र आहे. भाजपने स्पष्ट संदेश दिल्याने शिंदे यांच्या भूमिकेत बदल झाला. तसेच शिवसेनेच्या प्रवक्त्‌‍यांची भाषाही मंगळवारी सौम्य झाली.

निकालानंतर मुख्यमंत्रीपद कायम राहावे यासाठी शिंदे यांच्याकडून दबावाचे राजकारण सुरू झाले होते. महायुतीच्या यशात आपले अधिक योगदान असल्याने किमान दोन ते अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच कायम राहावे, अशी शिंदे यांची भूमिका होती. शिवसेनेच्या प्रवक्त्‌‍यांकडून शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी उघडपणे मागणी करण्यात येत होती. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतही शिंदे यांचीच मुख्यमंत्रीपदी फेरवनिवड करावी, असा आमदारांचा सूर होता.

सोमवारी दिवसभर शिंदे यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. लाडक्या बहिणी, आरोग्य सेवा, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभाथना पुढे करून शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी करण्यात आली. राज्यभर विविध मंदिरांमध्ये महाआरती, पूजाअर्चा करण्यात आली. शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी वातावरणनिर्मिती करण्यात आली. मंगळवारी मुख्यमंत्री शिंदे हे राजीनाम्याची औपचारिकता पूर्ण करण्यापूव मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची शिवसेनेची योजना होती. त्यासाठी ठाणे, मुंबईत विभागप्रमुखांकडून कार्यकर्त्यांना वर्षा निवासस्थानी जमण्याचे आदेश देण्यात आले.

सोमवारी मध्यरात्री बहुधा सूत्रे फिरली असावीत. कारण मुख्यमंत्री शिंदे यांनी मध्यरात्री 12.53 मिनिटाने एक्स समाज माध्यमावरून कार्यकर्त्यांनी वर्षा किंवा अन्य कुठे जमू नये, असे बजावले. तसेच महायुती भक्कम असल्याचा निर्वाळा दिला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी राजीनामा देण्याची औपचारिकता पूर्ण केल्यावर शिवसेनेचे प्रवक्ते व मावळते मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर सौम्य भूमिका घेतली.

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा;शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (26 नोव्हेंबर) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ विसर्जित झालं आहे. राजभवनावर जाऊन शिंदे यांनी राज्यपालाकांडे राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यामुळे 14 वी विधानसभा विसर्जित झाली आहे. तसेच एकनाथ शिंदे पुढील काही दिवस काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहतील. शिंदे यांनी राजीनामा दिला तेव्हा त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. राजीनामा दिल्यानंतर हे नेते राजभवानाबाहेर पडल्यानंतर केसरकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला आहे. तसेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. येत्या काही दिवसांत नवं सरकार स्थापन होईल असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे केंद्रात मंत्री होणार?
महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असल्याने ते लवकरच सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर व्हावी, यासाठी भाजपकडून मास्टरप्लॅन आखण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एकनाथ शिंदे यांना दिल्लीत केंद्रीय मंत्रीपद देण्यात येणार असल्याचे सूचक विधान केले आहे. भाजपने मुख्यमंत्री कोण होणार हे निश्चित केले आहे. आमच्या जागा जास्त आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असा संदेश भाजपने एकनाथ शिंदेना दिला आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, असेही बोललं जात आहे. यात भाजपचे 10 आमदार, शिवसेना शिंदे गट 6, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महापालिका वॉर्ड रचनेची प्रतीक्षा संपली; तीन वॉर्डात काय आणि कसे झाले बदल पहा

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता एक हरकत अंशतः मान्य; महानगरपालिकेच्या...

भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय शोकसभेचे आयोजन

अहिल्‍यानगर / नगर सह्याद्री - भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय...

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...