spot_img
ब्रेकिंगशरद पवारांचा सरकारला ''दे धक्का''; मविआत पवार निर्याणक भूमिकेत?, पवारांच्या डोक्यात नेमकं...

शरद पवारांचा सरकारला ”दे धक्का”; मविआत पवार निर्याणक भूमिकेत?, पवारांच्या डोक्यात नेमकं काय…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री
लोकसभा निवडणुकीत भावनिक आणि मुद्द्यांचे राजकारण महाविकास आघाडीला फायद्याचे ठरलं होतं. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मतदारांनी चांगली साथ दिली. त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्येही शरद पवारांची राष्ट्रवादी कमी जागा लढवूनही निर्णायक भूमिकेत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवारांची राष्ट्रवादी कोणाकोणावर भारी पडणार हेच पाहायचं.

लोकसभा निवडणूकीत काँग्रेसनं राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्या. मात्र अवघ्या 10 जागा लढवून 8 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे पवारांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट अधिक होता. विधानसभेतही शरद पवारांच्या पदरी कमी जागा पडल्यात. मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये राष्ट्रवादी नाही असं विधान पवारांनी केलं होतं. खरं तर पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे.

परिणामी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मविआत दुरावा, मतभेद आणि वेगळं समीकरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होतेय. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष निर्णायक भूमिकेत असणार यात नवल नाही.

लोकसभेच्या निकालानंतर ‘महायुती’ सावध झालीये.कल्याणकारी योजनांचे धडाधड निर्णय घेत लोकसभेच्या निकालाचे अपयश पुसण्याचा आटोकाट प्रयत्न महायुतीनं केला.अशात निवडणुकीचा निकाल नेमका कोणाच्या बाजूने लागणार, हे सांगणे सध्या कठीण आहे.त्यामुळेच निकालानंतर काँग्रेस आणि भाजप वगळता उर्वरित पक्ष हे कोणाशीही ‘युती आणि आघाडी’ करण्यासाठी मागेपुढे पाहणार नाहीत. त्यामुळे पुढील काळात शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक भूमिकेत राहील, असा अंदाज बांधला जातोय.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरातील तीन समाजकंटक हद्दपार; वाचा नगर क्राईम

​अहिल्यानगर । नगर सह्याद्री ​अहिल्यानगर शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कोतवाली...

जिल्हा बँक सोनेतारण व्यवसाय वाढवणार : चेअरमन चंद्रशेखर घुले

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोनेतारण व्यवसायात वाढ करणार...

सामूहिक आत्महत्येने नाशिक हादरले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने २ मुलांसह विहिरीत मारली उडी

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना...

मनपाच्या मतदार यादीत २० हजार नावांची हेराफेरी; कोण काय म्हणाले पहा

दोषींवर गुन्हा दाखल करण्याची नितीन भुतारे यांची मागणी अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेने...