spot_img
महाराष्ट्रबारामतीमधील नमो महारोजगार मेळाव्यात शरद पवारांचीच चर्चा, अजित दादांचा चेहरा पडल्याची कुजबुज

बारामतीमधील नमो महारोजगार मेळाव्यात शरद पवारांचीच चर्चा, अजित दादांचा चेहरा पडल्याची कुजबुज

spot_img

बारामती | नगर सह्याद्री
बारामतीत आज (२ मार्च) मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित नमो महारोजगार मेळावा पार पडला. या निमित्ताने लोकसभेचे रणशिंग फुंकण्याचा मनोदय महायुतीचा होता. परंतु हा कार्यक्रम शासकीय असल्याची आठवण खा.शरद पवार यांनी करुन दिली.

त्यामुळे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री तरीही लोकसभेच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार का, याची उत्सुकता लागली होती. अशातच शरद पवार यांचे मंचावर आगमन झाले आणि बारामतीकरांनी एकच जल्लोष केला. त्यामुळे बारामतीत शक्तिप्रदर्शनाचा मनसुबा बाळगणार्‍या अजितदादांचं मार्केट शरद पवारांनी व्यासपीठावर उपस्थित राहून खाललं अशी चर्चा होती.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित राहिल्या आहेत. दरम्यान, या मेळाव्यात ५५ हजार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या असून साडेतीनशेहून अधिक कंपन्या या मेळाव्यात सहभागी झाल्या आहेत. आतापर्यंत ३३ हजार युवक, युवतींनी यामध्ये सहभागासाठी नोंदणी केली आहे.

नमो महारोजगार मेळाव्याला खा.शरद पवार, सुप्रिया सुळे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनेत्रा पवार, डॉ.नीलम गोर्‍हे, मंगलप्रभात लोढा यांची मंचावर उपस्थिती पाहायला मिळाली. शरद पवार यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत नव्हतं, मात्र विरोधी पक्षातून टीकेची झोड उठल्यानंतर शरद पवारांचं नाव निमंत्रण पत्रिकेत शासकीय अधिकार्‍यांना समाविष्ट करावं लागलं.

त्यानंतर मेळाव्यासाठी खुद्द शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित राहिल्या आहेत. दरम्यान, या मेळाव्यात ५५ हजार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या असून साडेतीनशेहून अधिक कंपन्या या मेळाव्यात सहभागी झाल्या आहेत. आतापर्यंत ३३ हजार युवक, युवतींनी यामध्ये सहभागासाठी नोंदणी केली आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून मुलीसमोरच आईची केली हत्या

अकोला / नगर सह्याद्री - अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारित्र्याच्या...

मुली गरिबांना द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका हो!:गौरी गर्जेच्या वडिलांनी फोडला टाहो..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या...

सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपला; सुपरस्टार धर्मेंद्र यांच निधन

मुंबई । नगर सहयाद्री :- धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही...

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज; प्रशासनाकडून हिरवा कंदील, आता डबल गिफ्ट मिळणार?

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया...