spot_img
आर्थिकSGB Scheme : एकदम स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी ! पहा मोदी...

SGB Scheme : एकदम स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी ! पहा मोदी सरकारची खास स्कीम

spot_img

मुंबई / नगरसह्याद्री : सोन्याचे भाव प्रचंड वाढले आहे. परंतु तुम्हाला जर म्हटलं की, तुम्हाला स्वस्तात सोने खरेदी करायची संधी आहे, तर? ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. केंद्र सरकार तुम्हाला स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी देत ​​आहे.

तुम्हीही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर 18 ते 22 डिसेंबर हे पाच दिवस तुमच्यासाठी खास असतील. आजपासून सॉवरेन गोल्ड बॉन्ड 2023-24 ची तिसरी सीरीज सुरू झाली आहे. आता तुम्हाला पुढील 5 दिवस बाजारापेक्षा कमी दरात सोने खरेदी करण्याची संधी आहे.

10 ग्रॅम सोन्याची किंमत किती?
सॉवरेन गोल्ड बॉन्डचे दर रिझर्व्ह बँकेद्वारे जारी केले जातात. यात एक ग्रॅम सोन्याची किंमत 6199 रुपये निश्चित करण्यात आली आहे. 10 ग्रॅम सोने खरेदी केल्यास 61990 रुपये मोजावे लागतील. ही किंमत आजच्या बाजारभावापेक्षा कमी आहे.

ऑनलाइन खरेदीवर एक्स्ट्रा सूट
जर तुम्ही ऑनलाइन सोने खरेदी केले तर तुम्हाला प्रति ग्रॅम 50 रुपये अतिरिक्त सूट मिळेल. म्हणजेच, जर तुम्ही सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये पैसे ऑनलाइन गुंतवले तर तुम्हाला प्रति ग्रॅम 6149 रुपये खर्च करावे लागतील.

गोल्ड बॉन्ड कोठे खरेदी करावेत?
तुम्ही या गोल्ड बाँडमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने गुंतवणूक करू शकता. तुम्ही कोणत्याही बँक शाखा, पोस्ट ऑफिस, बीएसई, एनएसई किंवा स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमधून खरेदी करू शकता.

किती व्याज मिळतेय?
सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम सरकारने सुरू केली आहे. यामध्ये तुम्ही 1 ग्रॅम ते 4 किलोपर्यंत सोने खरेदी करू शकता. सध्या यावर 2.5 टक्के दराने वार्षिक व्याजाचा लाभ मिळत आहे. जर तुम्हाला जास्त पैशांची गरज असेल तर तुम्ही त्यावर कर्ज देखील घेऊ शकता.

सॉवरेन गोल्ड बॉन्डची काय आहेत वैशिष्ट्ये
>> सार्वभौम गोल्ड बाँडचा मॅच्युरिटी कालावधी 8 वर्षे आहे.
>> या योजनेत मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर नफ्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही.
>> जर तुम्ही मॅच्युरिटीपूर्वी किंवा 5 वर्षांनी पैसे काढले तर तुम्हाला त्यावर LTCG भरावा लागेल.
>> तुम्हाला लाँग टर्म कॅपिटल गेन (LTCG) स्वरूपात सुमारे 20.8 टक्के कर भरावा लागेल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...