spot_img
ब्रेकिंगएकाच कुटुंबातील सात जणांची सामूहिक आत्महत्या; गाडीत सापडली सुसाईड नोट

एकाच कुटुंबातील सात जणांची सामूहिक आत्महत्या; गाडीत सापडली सुसाईड नोट

spot_img

Crime News: हरियाणातील पंचकुला शहरातील सेक्टर 27 मध्ये एकाच कुटुंबातील सात सदस्यांनी गाडीमध्ये बसून विष प्राशन करत सामूहिक आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यांना गाडीतच सुसाईड नोट सापडली असून, त्यात कर्जाच्या ओझ्यामुळे आयुष्य संपवत असल्याचा उल्लेख केलेला आहे. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मृतांमध्ये देहरादूनमधील रहिवासी प्रवीण मित्तल (42), त्यांचे पालक, पत्नी आणि तीन मुले (दोन मुली आणि एक मुलगा) यांचा समावेश आहे. सर्वांचे मृतदेह घराबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये आढळले. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, मृत कुटुंब आधी एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. देहरादूनहून ते पंचकुलात गेले होते. कथा ऐकून परतल्यानंतर त्यांनी कारमध्येच आत्महत्या केली.

दरम्यान, प्रवीण मित्तल यांनी अलीकडेच टूर अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला होता. व्यवसाय अधिक चांगला करण्यासाठी यात त्यांनी बराच खर्च केला होता. मात्र, यामध्ये त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. व्यवसाय चालला नाही. आपल्याकडील सर्व पैसे त्यांनी या व्यवसायात गुंतवले होते. त्यांच्यावर प्रचंड कर्जही होते. त्यांच्याकडे घरखर्च होईल इतकेही पैसे नव्हते. याच आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खडीमाफिया दत्तात्रय शेळके म्हणतो, कलेक्टर अन्‌‍ पोलीस माझ्या खिशात!

अकोले तहसीलदारांनी वहिवाट रस्ता मंजूर केला, बेलापूरच्या खडी क्रशरवाल्याने उखडून टाकला! 10 लाख खर्चून तयार...

‘सिस्पे’, साकळाई योजनेबद्दल विखे पाटलांचे मोठे विधान, जनतेच्या पैशाची जबाबदारी ‘त्या’ लोकप्रतिनिधीची

पद्मश्रींच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांना सन्मान; शेतकरी दिनाच्या घोषणेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे डॉ. सुजय विखे...

आझाद ठुबे यांच्या राजे शिवाजी पतसंस्थेत 67 कोटींचा घोटाळा

अपहाराशी संबंधित 40 घोटाळेबहाद्दरांसह सहा कर्मचारी दोषी पारनेर | नगर सह्याद्री माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद...

गणेश मंडळांना मिळणार एका क्लिकवर परवानगी; आयुक्त डांगे यांनी दिली माहिती, पहा लिंक..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री गणेशोत्सवात व इतर सण-उत्सव काळात मंडप उभारणी, स्वागत कमानी, रनिंग मंडपसाठी...