spot_img
अहमदनगरसर्व्हर डाउन; लाडक्या बहिणी वैतागल्या,रात्रभर जागूनही भरेनात अर्ज

सर्व्हर डाउन; लाडक्या बहिणी वैतागल्या,रात्रभर जागूनही भरेनात अर्ज

spot_img

अंगणवाडी सेविकांना मनस्ताप | रात्रभर जागूनही अर्ज भरेनात | सेतू, तहसील कार्यालयात महिलांची गर्दी

अहमदनगर | नगर सह्याद्री

सर्व्हर डाऊन….अपूर्ण कागदपत्रे.. अ‍ॅप ओपन होईना… ओपन झालं तर कागदपत्रे अपलोड करण्यास लागतोय वेळ… अशा एक ना अनेक तांत्रिक समस्यांनी लाडक्या बहिणी व अंगणवाडी सेविका वैतागल्या आहेत. दिवसभर सर्व्हर डाऊन असतेच. परंतु रात्रभर जागूनही अर्ज सबमिट होत नसल्याने लाडक्या बहिणी वैतागल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी तसेच विविध दाखले काढण्यासाठी सेतू कार्यालय, तहसील कार्यालयांसमोर महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी होतांना दिसत आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणफ योजनेचा जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना फायदा हवा यासाठी जिल्हा व तालुका प्रशासनाने प्रत्येक गावात शिबिराचे आयोजन केले होते. यामुळे फॉर्म भरण्यासाठी सकाळपासूनच महिलांनी कॅम्पच्या ठिकाणी गर्दी केली होती. हातावर पोट असणार्‍या महिला रोजगार बुडवून फॉर्म भरण्यासाठी थांबले होत्या. मात्र, कागदपत्रांची जुळवाजुळव व दिवसभर वाट पाहूनही सर्व्हर डाऊन असल्याने अनेक महिलांना रिकाम्या हाती घराची वाटधरावी लागली.

नारी शक्ती अ‍ॅप ओपन झाले तरी अर्ज भरतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत. मुलीचे लग्न झाले पण तिचे नाव माहेरच्याच शिधापत्रिकेत आहे. उत्पन्नाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, बँकेचे अकाऊंट अशा विविध अडचणींना सामना करावा लागत आहे.
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज भरण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे. त्यामुळे महिलांनी गडबड करू नये. जिल्ह्यात सर्वत्र शिबिराचे आयोजन केलेले आहे. त्यामुळे सर्वत्र ऑनलाइन फॉर्म भरण्याचे काम सुरू असल्याने अ‍ॅप स्लो चालत आहे, असे अधिकार्‍यांकडून सांगितले जात आहे.

प्रॉब्लेम… वैताग अन् संताप
नारी शक्ती अ‍ॅप ओपन होईना…. इंटरनेटचा प्रॉब्लेम… सर्व्हर डाऊन… कागदपत्रं अपलोड करण्यास वेळ लागतोय… अपूर्ण कागदपत्रं… या एक ना अशा अनेक कारणांमुळे अंगणवाडीताई पूर्णपणे वैतागल्या आहेत. याशिवाय गर्दी, गोंधळ अन् जेवण करायलाही वेळ मिळत नसल्याने अंगणवाडीताईंचा संताप वाढत असून, वैतागही वाढला आहे. दरम्यान गावच्या रोषालाही सामोरे जावे लागत असल्याचे गावोगावचे चित्र पहावयास मिळत आहे.

घरातील दोनपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना लाभ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत एकाच कुटुंबातील दोन महिलांना लाभ दिला जाणार होता. मात्र या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. त्यानुसार कुटुंबाची व्याख्या स्पष्ट केली असून त्यानुसार कुटुंब म्हणजे पती, पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले किंवा मुली असे ग्राह्य धरले जाणार आहे. यामुळे एकाच घरातील आता दोनपेक्षा जादा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा निर्णय क्रांतिकारी : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
नगर शहरात मनपाच्या वतीने राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मदत केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते संपन्न
राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मंजूर केली असून महिलांचे आर्थिक स्तर उंचविण्यासाठी मदत होईल याचबरोबर आपल्या कुटुंबाला हातभार लावता येईल व महिलांचे सक्षमीकरणासाठी पाठबळ मिळेल नगर जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी दोन दिवस विशेष मोहीम हाती घेतली आहे, या योजनेची जनजागृती मोठ्या प्रमाणात केली जात आहे, ही योजना पारदर्शकपणे राबवली जात असून थेट महिलेच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा होणार आहे, अहमदनगर महापालिकेने शहरात ठिकठिकाणी महिलांसाठी मदत केंद्र उभारले आहे तरी महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले
नगर शहरात मनपाच्या वतीने केडगाव देवी परिसर येथे राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मदत केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी मनपा आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर, स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर, प्रसिद्धी प्रमुख अधिकारी शशिकांत नजान, प्रभाग अधिकारी अशोक साबळे, नाना गोसावी, सुखदेव गुंड, अजित कोतकर आदीसह अधिकारी कर्मचारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नगर शहरात यशस्वीपणे राबवली जात असून महिलांना अधिक सोयीचे व्हावे यासाठी 16 मदत केंद्र तयार केले असून ठिकठिकाणी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहे. अंगणवाडी सेविका नगर शहरांमध्ये नागरिकांच्या घरोघरी जाऊन अर्ज भरून घेत आहे या योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने शेवटच्या घटकापर्यंत देण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न केले जाईल असे ते म्हणाले. यावेळी माजी सभापती मनोज कोतकर यांनी उपस्थितांचे आभार मानले

महिलांनी पाहिले जिल्हाधिकारी यांचे माणुसकीचे दर्शन
महापालिकेच्या वतीने केडगाव देवी परिसर येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मदत केंद्र सुरू करण्यात आले त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी जिल्हाधिकारी यांनी थेट महिलांशी संवाद साधत योजनेची माहिती दिली तसेच महिलांचे मोबाईलवर ऑनलाइन फॉर्म भरून घेण्यास सुरुवात केली यावेळी जिल्हाधिकारी यांनी थेट मोबाईलवरच महिलेचा फोटो काढत साइटवरअपलोड केला, जिल्हाधिकारी यांचे साधेपणा पाहून महिला भारवल्या यावेळी महिलांनी एकमेकीशी संवाद साधत जिल्हाधिकारी यांचे माणुसकीचे दर्शन घडले असल्याची चर्चा केली

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण” योजना अंमलबजावणीसाठी शहरी, ग्रामीण भागामध्ये शिबीरांचे आयोजन
अहमदनगर : “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण” योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी शहरी व ग्रामीण भागामध्ये अधिकाधिक शिबीरांचे आयोजन करुन लाभार्थ्यांकडून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. योजनेचे अर्ज भरुन घेताना लाभार्थ्याच्या आधारकार्डवर नमूद असलेले नाव तसेच आधारकार्डला लिंक असलेल्या बँक खात्याची माहिती नारीशक्ती ॲपवर अचूकपणे नोंदविण्याच्या सुचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात १२ व १३ जुलै, 2024 दरम्यान “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण” योजनेंतर्गत विशेष शिबीरांचे आयोजन करत लाभार्थ्यांकडून ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरुन घेण्यात येत आहेत. ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांचे “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण” योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने नोंदवितांना संबंधित लाभार्थ्यांच्या आधारकार्डवर लाभार्थ्याचे नमूद असलेले नाव जशेच्या तसे नारी शक्ती ॲपवर नोंदविणे आवश्यक आहे. तसेच बँकखाते क्रमांक लाभार्थ्याच्या आधारकार्डला लिंक असणे आवश्यक आहे. या बाबींची खात्री झाल्यानंतरच लाभार्थ्याचे नाव व बँक खाते क्रमांक नारीशक्ती ॲपवर नोंदविण्यात यावेत.
नवविवाहित महिलेचे नाव लगेच रेशनकार्डवर लावणे शक्य होत नसल्याने विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या विवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. तसेच या योजनेच्या लाभासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येणार आहे. योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी,अंगणवाडी सेविका एनयुएलएम यांचे समुह संघटक, मदत कक्ष प्रमुख व सीएमएम, आशा सेविका, सेतु सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरुन घेण्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण” योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी त्यांचे अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती व इतर मार्गदर्शन शिबीरस्थळी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शिबीरस्थळी उपस्थित राहून अर्ज सादर करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

क्रिकेट खेळणं चिमुकल्याला पडले महागात; विजेचा धक्का लागून मृत्यू, कुठे घडली घटना?

Maharashtra News: रविवारी सायंकाळी क्रिकेट खेळत असताना विजेच्या धक्क्याने एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू...

‘जुन्या विश्वासाची’ काँग्रेस करणार ‘पोल खोल’; नागरी समस्यांवरून किरण काळेंचा आक्रमक पवित्रा

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शहरात मागील दहा वर्षांमध्ये कोणते ही ठोस असे विकास काम झालेले...

महिलेसोबत वाद केला, तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आला अन् हत्यारांसह जेरबंद झाला; नेमकं काय घडलं..

Ahmednagar Crime News: महिलेसोबत वाद करून तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या तरूणाच्या कारमध्ये धारदार...

कुणाला शुभफल, कुणाला अडथळे..? सोमवारचा दिवस कसा जाईल? वाचा, आजचे राशी भविष्य!

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य विनाकारण संशय नात्याला खराब करण्याचे काम करते....