spot_img
ब्रेकिंगसंसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक, दोघे संसदेत घुसले..खासदारांच्या बाकावर उड्या मारल्या..पिवळा धूर..अन..

संसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक, दोघे संसदेत घुसले..खासदारांच्या बाकावर उड्या मारल्या..पिवळा धूर..अन..

spot_img

नवी दिल्ली / नगर सह्याद्री : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेतील सुरक्षेमध्ये चूक घडल्याचे समोर आले आहे. आज (बुधवार) लोकसभेचे कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीमधून दोन जणांनी सभागृहात उडी मारली. तसेच या दोघांनी सभागृहातील बेंचवर उड्या मारून गोंधळ घातला.

त्याबरोबरच त्यांनी सभागृहात स्मोक कँडल पेटवल्या. या दोघांनाही पकडण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. सागर, अमोल शिंदे, नीलम सिंह या तिघांना ताब्यात घेतले आहे. अमोल शिंदे याने संसदेबाहेर फटाके पेटवले असल्याचे म्हटले आहे.

अधिक माहिती अशी : प्राथमिक माहितीनुसार तीन जणांनी संसद भवन परिसरामध्ये गोंधळ घातला असून, त्यांच्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. एक महिला आणि पुरुष एका खासदाराच्या पासवर संसदेत शिरले. संसदेच्या बाहेर आधी त्यांनी फटाके फोडले.

यावेळी त्यांनी भारतमाता की जय, तानाशाही नही चलेगी आदी घोषणा दिल्या. ट्रान्स्पोर्ट भवनाच्या बाहेर हा गोंधळ घालण्यात आला. यावेळी त्यांनी पिवळ्या रंगाचा गॅसही फोडला. त्यामुळे संसद भवन परिसर पिवळा झाला होता. त्यानंतर हे दोघेही संसदेच्या प्रेक्षक गॅलरीत आले. यावेळी त्यांनी जोरजोरात घोषणा देत संसद सभागृहात प्रवेश केला. दोघांनी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीमधून सभागृहात उड्या मारल्या. तसेच त्यांनी सभागृहातील बाकांवर उड्या मारून अध्यक्षांच्या आसनाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. तसेच सभागृहात स्मोक कँडल पेटवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्या दोघांना सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....