spot_img
अहमदनगरAhmednagar: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी बजावला मतदानाचा हक्क! मतदारांना केले मोठे आवाहन,...

Ahmednagar: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी बजावला मतदानाचा हक्क! मतदारांना केले मोठे आवाहन, पहा काय म्हणाले..

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना राळेगणसिद्धीमध्ये मतदानाचा अधिकार बजावला आहे. या वेळी अण्णा हजारेंनी कोणाला मतदान करावे याविषयी मतदारांना सल्ला दिला आहे. पक्ष आणि व्यक्ती न पाहता आपण मतदान करणारा उमेदवार चारित्र्यशील, विचारशील आणि निष्कलंक असला पाहिजे, असे अण्णा हजारे म्हणाले. तसेच देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल तर मतदाराची जबाबदारी फार महत्त्वाची आहे, असे अण्णा हजारे म्हणाले. ते राळेगणसिद्धीमध्ये माध्यमांशी बोलत होते.

अण्णा हजारे म्हणाले, ज्यांना मतदान करायचे त्यांनी मागच्या काळात काय केले ते पाहणे महत्त्वाचे आहे. तो मतदारसंघासाठी किती झिजला, दिव्यासारखा किती जळला हे पाहणे गरजेचे आहे. ते पाहूनच मतदान करा. मतदाराने मतदान करताना खालील गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. मतदाराने मतदान करताना खालील गोष्टी लक्षात गरजेचे आहे.

मत देताना तो आचारशील, विचारशील, निष्कलंक जीवन, अपमन सहन करण्याची शक्ती हे गुण पाहिजे. तो दिव्यासारखा झटत राहिला पाहिजे. मतदाराने ज्यांना मतदान करायचे त्याचे चारित्र्कसे आहे. त्याचे आचार- विचार कसे आहे? त्याचे जीवन निष्कलंक आहे का? दाग लागलेले आहे का? हे पाहिले पाहिजे. खरी लोकशाही आणायची असेल तर मतदारांची जबाबादारी महत्त्वाची आहे.

मतदान केले पाहिजे. मी पक्ष पाहत नाही स्त्री किंवा पुरुष असेल तरी त्याचे चारित्र्य चांगले पाहिजे. हा देश कोणी चालवायचा त्याची चावी कोणाच्या हातात द्यायची हे ठरवायचे आपल्या हातात आहे. मतदाराच्या हाती चावी आहे. योग्य चावी लावली पाहिजे. चावी चुकीच्या हातात गेली तर देशाचे वाटोळे होईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...