spot_img
अहमदनगरसेनापती बापट पतसंस्था ठेवीदारांना वार्‍यावर सोडणार नाही: माजी आ.औटी

सेनापती बापट पतसंस्था ठेवीदारांना वार्‍यावर सोडणार नाही: माजी आ.औटी

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
सेनापती बापट पतसंस्थेत ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षीत आहेत. मध्यंतरी काही पतसंस्थांबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आणि त्यातून संशयाचे मळभ तयार झाले. दरम्यानच्या काळात कोरोना लाट आली. यातून निश्चितपणे सेनापती बापट पतसंस्था संस्थेचे चेअरमन रामदास भोसले यांच्या माध्यमातून मार्ग काढेल आणि टप्याटप्याने सर्वांच्या ठेवी मिळतील. कर्जदारांनीही यासाठी संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन विधानसभेचे माजी उपाध्यक्ष व सेनापती बापत पतसंस्थेचे मार्गदर्शक विजयराव औटी यांनी केले.

सेनापती बापट पतसंस्थेत ठेवीदारांना ठेवी देण्यास उशिर लागत असला तरी प्राधान्यक्रम आणि गरजेनुसार प्रत्येक ठेवीदाराला ठेव देण्यासाठी आम्ही कार्यक्रम आखला असल्याचे संस्थेचे अध्यक्ष रामदास भोसले यांनी सांगितले. तालुक्यात काही पतसंस्था आणि त्यांच्या संचालकांनी गडबड केल्याने त्याचे परिणाम कारण नसताना अन्य पतसंस्थांना भोगावे लागत आहेत. मात्र, हा अडचणीचा काळ नक्कीच जाईल आणि ठेवीदारांना त्यांच्या ठेवी मिळतील.

संस्थेची गुंतवणूक आणि भांडवल मोठे असून त्या अनुषंगाने विचार केला तर संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. संस्थेचे संचालक मंडळ कर्ज वसुलीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्नशिल आहे. कर्जदारांनी संस्थेला कर्ज वसुलीकामी सहकार्य चालवले असून त्यांच्या सहकार्यातूनच ठेवीदारांना दिलासा देण्याचे काम होत आहे. संस्थेचे कर्मचारी देखील याअनुषंगाने काम करत असल्याचे रामदास भोसले यांनी सांगितले.दरम्यान, संस्थेच्या कर्मचार्‍यांना आता ठेवीदारांनी सहकार्य करावे आणि संबंधित शाखांमधील गावकरी व कार्यकर्त्यांनी देखील या कामी सहकार्याची भूमिका घ्यावी असे आवाहन माजी आमदार विजय औटी यांनी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

द्राक्षाचा गोडवा वाढला! कीलोला किती रुपयांचा दर?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव,घारगाव ,कोळगाव, वडळी, आढळगाव, कोकणगाव, हिरडगाव, बेलवंडी कोठार,...

वेश्या व्यवसाय करणाऱ्या प्रियसीला संपवलं; रेड लाईट परिसरात प्रियकराच भयंकर कृत्य!

मुंबई । नगर सहयाद्री चारित्र्यावर संशय घेत प्रियकरानं वेश्या व्यवसायात काम करणाऱ्या महिलेची हत्या...

रखरखत्या उन्हात पडणार रिमझिम धारा, हवामानात होणार बदल!

मुंबई । नगर । सहयाद्री:- देशभरात सध्या हवामानामध्ये सतत बदल होत असून, तापमानाचा अंदाज...

कोतवाली पोलिसांची कामगिरी; ५ वर्षांची हरवलेली चिमुकली ४० मिनिटात सापडली..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- १४ मार्च रोजी सकाळी दहा वाजता, केडगाव परिसरातील रोशन कुमार...