spot_img
अहमदनगरParner News: जलजीवन मध्ये घोटाळाआणि 'त्याची' संगमनत! आमदार लंके यांनी केले 'हे'...

Parner News: जलजीवन मध्ये घोटाळाआणि ‘त्याची’ संगमनत! आमदार लंके यांनी केले ‘हे’ आरोप

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री-

Nilesh Lanka News: जलजीवन मिशन अभियानांतर्गत नगर जिल्ह्यात राबविलेल्या पाणी योजनांच्या निविदा प्रक्रियेत मुख्य कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी संगनमताने घोटाळा केल्याचा आरोप आमदार नीलेश लंके यांनी हिवाळी अधिवेशनात केला आहे. हा घोटाळा करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी आ. लंके यांनी विधानसभेत केली. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व गैरव्यवहार झाला असून याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

विधानसभेत बोलताना आ. लंके म्हणाले, ठेकेदारास काम देण्यास गैरमार्गाचा अनेकदा अवलंब करण्यात आला आहे. खोटी कागदपत्रे जोडणे, ठेका मिळाल्यानंतर काम पूर्ण नसणे, बीड कॅपॅसिटी नसताना वाढवून दाखविणे, या सोबतच शिवशंकर एंटरप्राईजेस, संजयदादा भाबड, समृद्धी कन्स्ट्रशन (बीड) यांना कॅपॅसिटीपेक्षा सहा कोटींची जास्त कामे देण्यात आल्याचे आ. लंके यांनी निदर्शनास आणून दिले. एका ठेकेदारास सुरूवातील अपात्र ठरविणे व त्याच ठेेकेदाराला लगेच दोन दिवसांत पात्र ठरविण्यात आले आहे.

टेेंडर रद्द करून पुन्हा करणे, टेेंडर नोटीसमधील अटी बदलणे अशा गैरमार्गाचा अवलंब केल्याच्या तक्रारी कार्यकारी अभियंता यांच्याकडे करूनही काहीही कारवाई आली नसल्याचे आ. लंके यांनी नमूद केले. जल जीवन कार्यक्रमांतर्गत पारनेर-नगर मतदारसंघातील जामगांवसह सहा गावांत पाणी पुरवठा योजनेचे काम घेताना संतोष इन्फ्रा (नांदेड) यांनी खोटी व बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केली आहे. ठेकेदाराकडे कोणतीही कागदपत्रे नसताना काम देण्यात आले आहे. या ठेकेदाराने काम पूर्ण झाल्याचे दाखलेही खोटे सादर केले असून त्यावर संबंधित विभागाच्या जावक क्रमांकाचा उल्लेख नाही. तसेच सही देखील बनावट आहे.

शासन निर्णयाप्रमाणे प्रक्रिया राबविलेली नसल्याचा आरोप आ. लंके यांनी केला. ठेका घेतलेली सर्व कामे २५ ते ३० टक्के पूर्ण आहेत. टेंडर प्रक्रियेमध्ये सहभागी व्यक्ती, संस्था यांच्याविषयी नगर जिल्हयातील लोकप्रतिनिधीनींनी जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे पुराव्यासह वारंवार तक्रारी करूनही चौकशी करण्यात येत नाही. ठेकेदारासबंधी माहिती मागविल्यानंतर देण्यात येत नाही. बनावट कागदपत्रे सादर करून ठेकेदाराने कामे मिळविली आहेत. या ठेकेदारांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी आ. लंके यांनी केली.

ट्रान्सफॉर्मरची संख्या वाढवा..

पारनेर-नगर मतदारसंघात ६३ केव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफार्मरची संख्या दोन हजार इतकी आहे. ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर तोच पुन्हा दुरूस्त करून देण्यात येतो. वारंवार दुरूस्तीमुळे हे ट्रान्सफार्मर लगेच नादुरूस्त होतात. त्यासाठी ६३ केव्हीए क्षमतेचे ५०० ट्रान्सफॉमर मिळावेत. मतदारसंघात विद्युतीकरण केल्यापासून टाकलेल्या एलटी लाईन जीर्ण झाल्या असून त्या बदलण्यात याव्यात. कान्हूरपठार सबस्टेशन ते गोरेगांव सबस्टेशन यासाठी ३३ केव्हीए क्षमतेची लाईन टाकल्यास गोरेगांव, ढवळपुरी, भाळवणी या सब स्टेशनला ३३ केव्हीची रिंग होऊन शेतकर्‍यांना सुरळीत वीज पुरवठा होईल, असेही लंके यांनी निदर्शनास आणून दिले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हनी ट्रॅपचा धक्कादायक प्रकार! ‘जीवनसाथी डॉट कॉम’ बनावट आयडी, पुढे घडलं असं काही..

मुंबई । नगर सहयाद्री:- हनी ट्रॅपचा वापर करत ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या वेबसाइटवरून महिलांना...

महायुती सरकारचा धडाकेबाज निर्णय; गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणं हटवणार

मुंबई। नगर सहयाद्री:- महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेतले आहे. साच एक...

लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! २१०० रुपये कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध झाली आहे....

आयुक्त साहेब, चमकोगिरी नको फिल्डवर काम दाखवा; कोतकर काय म्हणाले पहा…

मनोज कोतकर | मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट | आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर शहरात भटया...