श्रीगोंदा । नगर सहयाद्री
शहरालगत अत्यंत नजिक असलेल्या लेंडी नाल्या जवळील शासनाची करोडो रुपयांची जमीन डोंबिवली महानगरपालिकेचे माजी आयुक्तासह नातलगांनी महाघोटाळा करत लुबाडली असल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. त्यामुळे दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कुटुंबाच्या संपत्तीची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शेतकरी कामगार महासंघाचे उपाध्यक्ष टिळक भोस यांनी दिला आहे.
लेंडी नाल्या जवळील जुना गट क्रमांक १११० व नवीन गट क्रमांक ११३१ मधील ३.१५ हेक्टर जमीन ही पाझर तलावासाठी शासनाने संपादित केली होती. त्या जमिनीचे अवार्ड देखील २७ मार्च १९८० साली झाले होते. त्यामुळे या जमिनीवर पूर्णतः शासनाची मालकी होती. असे असताना सरकारकडे संपादित झालेली जमिनींचे बेकायदेशीर खरेदी करून त्या जमिनीचावापर करण्यात आला. व हे सर्व करण्यासाठी रोहित भाऊसाहेब दांगडे (मुलगा) व प्राची रोहित दंगडे (सून) व इतर नातेवाईक यांनी सरकारी अधिकारी यांच्याकडे आकृषक परवाना काढण्यासाठी खोटी माहिती दिली आहे. व शासनाने संपादित केलेली जमीनीचे बेकायदेशीर ( एन. ए. ) केले आहे. ही गोष्ट बेकायदेशीर होती. ती करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर करून भाऊसाहेब दांगडे यांनी त्यांचा मुलगा रोहित व सून प्राची यांच्या नावावर काही जमीन केली आहे.
तसेच जवळचे नातेवाईक उमेश कुंडलिक चव्हाण, सतीश नारायण कसरे, मनोज रामदास पोटे(माजी नगराध्यक्ष श्रीगोंदा नगरपरिषद), संतोष किसन टकले, गोपाळ वसंतराव पवार, वसुंधरा शशिकांत देशमुख, मोहन बापू शिंदे, संभाजी शिवाजी मोरे, सचिन नारायण कसरे,उमेश कुंडलिक चव्हाण(घुगलवडगाव) सोपान नामदेव शिंदे,चंद्रशेखर पोपटराव काळे, वृषाली कोंडीबा गोरे लालासाहेब रामचंद्र फाळके (काष्टी) आदी या गैर कृत्यामधे सहभाग आहे. वरील सर्वांनी मिळून शासकीय जमीन लुबाडून तिचे बेकायदेशीर ( एन. ए. ) करन्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज दाखल केले होते. व संगनमताने शासनाची फसवणूक करून भूसंपादित जमीनीचे बेकायदेशीर ( एन. ए. ) आकृषक परवानगी काढली होती.
या सर्व गैरकृत्यामधे,करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, तत्कालीन उपजिल्हाधिकारी (भूसंपादन शाखा), उपविभागीय अधिकारी भाग श्रीगोंदा पारनेर तहसीलदार श्रीगोंदा मिलिंद कुलथे, अव्वल कारकून( जमीन शाखा) घनश्याम गवळी, तत्कालीन श्रीगोंदा मंडल अधिकारी शरद झावरे तसेच तत्कालीन मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर श्रीगोंदा नगरपरिषद हे देखील सहभागी आहेत. त्यामुळे या दोषी सर्व अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे.
वरील सर्व बेकायदेशीर बाबी करून घेण्यात श्री.भाऊसाहेब दांगडे (पेट्रोकेमिकल्स महामंडळ व्यवस्थापकीय संचालक)यांचा हात आहे.या गोष्टी आमच्या निदर्शनास आल्यामुळे आम्ही महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे दिनांक ३१ जानेवारी २०२४ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यामुळे आयुक्तांनी भूसंपादन शाखा अहमदनगर जिल्हाधिकारी यांना ०५ फेब्रुवारी २०२४ रोजी चौकशी साठी आदेश दिला होता. त्यावर चौकिशी होऊनउपविभागीय अधिकारी यांनी १५ मार्च २०२४ रोजी भू संपादन अधिकारी अहमदनगर यांना अहवाल दिला आहे. त्यात जमिनीचे बेकायदेशीर NA झाले ले सिद्ध झाले असून ते तत्काळ रद्द करण्यात यावे असे स्पष्ट करण्यात आले आहे.त्यामुळे वरील भूखंड लाटण्यासाठी भाऊसाहेब दांगडे व त्यांचे सर्व नातेवाईक सहकारी यांनी शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे सर्वांवर तत्काळ गुन्हे दाखलकरून सनदी सेवेतून तातडीने बडतर्फ करण्यात यावी अशी मागणी शेतकरी कामगार महासंघाचे टिळक भोस यांनी केली आहे.
नगराध्यक्ष पोटे यांचा पदाचा गैरवापर
लेंडी नाला सुशोभीकरणाच्या नावाखाली गट नंबर ११३१ मधील बळकावलेल्या जमिनीकडे जाण्यासाठी सरकारी खर्चातून पुल व रस्ता करने हे सुद्धा काम बेकायदेशीर आहे.त्यात नगराध्यक्ष पोटे यांनी पदाचा गैरवापर केला आहे. त्यांच्यावर सुद्धा तत्काळ कारवाई करण्यात यावी.