spot_img
महाराष्ट्रसरफिर्या जावयाने सासऱ्याच्या घराला आग लावली, कारण काय?

सरफिर्या जावयाने सासऱ्याच्या घराला आग लावली, कारण काय?

spot_img

Maharashtra Crime News: पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून पतीने चक्क सासऱ्याच्या घराला आग लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत घरातील काही वस्तू जळाल्याने नुकसान झाले. कोथरूड पोलिसांनी पसार झालेल्या सरफिर्या जावयाला अटक केली आहे.

सदरची घटना कोथरूडमधील सुतारदरा परिसरात गुरुवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी कविता किसन फेंगसे (वय ४१, रा. काळुबाई कॉलनी, सुतारदारा, कोथरुड) सासूने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यावरून पोलिसांनी जावई साहिल हनुमंत हाळंदे (वय २५, रा. भूगाव, ता. मुळशी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तेजल हिचा साहिल हाळंदे याच्याशी विवाह झाला आहे. त्यांना एक मुलगा आहे. तेजल हिची सासू कविता हाळंदे यांचा तक्रारदार यांना फोन आला. साहिल कोणत्यातरी मुलीसोबत फिरतो. त्यामुळे साहिलचा पत्नीशी वाद झाला. त्यामुळे पत्नी रागाच्या भरात बुधवारी रात्री माहेरी निघून गेली.

दरम्यान, साहिल गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सासुरवाडीत गेला. त्याने पत्नीला मी तुझ्या घराजवळ आलो आहे, तू पाच मिनिटांत माझ्यासोबत घरी आली नाहीस, तर तुझ्या आईचे घर जाळून टाकेन अशी धमकी दिली. त्यानंतर साहिलने सासूच्या घराला आग लावली. कोथरूड पोलिसांनी पसार झालेल्या पतीला अटक केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

गावात बेकायदेशीर अतिक्रमण, सरपंचाने घेतला आक्रमक पवित्रा; जिल्हा परिषदेसमोर…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील साईनगर भागातील साई मंदिर ते पिंपळा...

युवकावर कोयत्याने हल्ला; अहिल्यानगर मधील घटना

वाहनांची तोडफोड | आठ जणांविरुद्ध गुन्हा अहिल्यानगर । नगर सहयाद्री: शहरातील जुने कोर्ट जवळ एका...

मनपा ऍक्शन मोडमध्ये! ईतक्या गाळ्यांना ठोकले सील, कारवाई तीव्र करणार..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकीत वसुलीसाठी महानगरपालिकेने शास्तीमध्ये जानेवारी अखेरपर्यंत...

माणुसकीला काळीमा फासणारी घटना; मुलासमोरच पत्नीची हत्या! कारण आलं उजेडात..

पुणे । नगर सहयाद्री पुण्याच्या खराडी भागातील एक धक्कादाक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना...