spot_img
मनोरंजनsara tendulkar-shubman gill : डीपफेक फोटोवरून संतापली सारा तेंडुलकर; म्हणाली माझ्या नावाचा...

sara tendulkar-shubman gill : डीपफेक फोटोवरून संतापली सारा तेंडुलकर; म्हणाली माझ्या नावाचा कोणीतरी गैरवापर…

spot_img

sara tendulkar-shubman gill मुंबई ः टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून सारा तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेटर शुभमन गिल यांचे अफेअर सुरू असल्याच्या चर्चा होत आहेत.

अशामध्येच सारा तेंडुलकरचा एक डीपफेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये सारा शुभमन गिलसोबत दिसत होती. या फोटोवरून सारा तेंडुलकरने प्रतिक्रिया दिली आहे.

या डीपफेक फोटोवरून ती चांगलीच संतापली आहे. सारा तेंडुलकरने डीपफेक फोटोवरून आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर भलीमोठी पोस्ट शेअर करत राग व्यक्त केला आहे. तिने या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ’माझे डीपफेक फोटो वास्तवापासून दूर आहेत. ट्विटरवर माझे अकाऊंट नाही. तरी देखील माझ्या नावाने कोणीतरी ट्विटरवर अकाऊंट उघडून त्याचा गैरवापर करत आहेत.

तसंच लोकांची दिशाभूल करत आहेत.’ तसंच, ’सोशल मीडिया हे आपल्यासाठी सुख-दु:ख आणि दैनंदिन घडामोडी शेअर करण्यासाठीचे प्लॅटफॉर्म आहे. पण काही लोकांकडून तंत्रज्ञानाचा गैरवापर होत आहे. ही बाब चिंताजनक आहे. कारण ते इंटरनेटचे सत्य आणि सत्यता हिरावून घेत आहेत. मला आशा आहे की ट्विटरने अशा अकाऊंटकडे लक्ष देऊन त्यांचे अकाऊंट सस्पेंड करावे. मनोरंजन कधीही सत्याच्या किंमतीवर नसावे.’, असं देखील तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पिकअप-रिक्षाचा भीषण अपघात; पाच जण गंभीर जखमी…

जामखेड / नगर सह्याद्री जामखेड करमाळा रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप वाहनाने पाडळी फाट्यावर असलेल्या...

Politics News: नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी भाजपानेच आखला डाव? ठाकरे गटाच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई। नगर सहयाद्री- शिनसेना ठाकरे गटाच्या मुखपत्रातून मोठा दावा करण्यात आला आहे. भाजपच्या अंतर्गत राजकारणावर...

‘सिंघम अगेन’ मधील अजय देवगणचा ‘फर्स्ट लूक’ समोर

नगर सहयाद्री टीम- बॉलीवुड अभिनेता अजय देवगणचं नाव घेतलं की त्याची ‘सिंघम’ व्यक्तिरेखा डोळ्यासमोर आल्याशिवाय...

सुखी संसारात पडलं विरजण! बावीस दिवसांपूर्वी झाले होते लग्न, पण क्षणात होत्याच नव्हतं झालं..

जामखेड । नगर सहयाद्री मोठ्या थाटामाटात विवाह पार पडल्यानंतर नव दाम्पत्य सुखी संसाराचे स्वप्न पाहत...