spot_img
अहमदनगरसंगमनेरचे राजकीय वातावरण बिघडले; थोरातांचा मंत्री विखेंवर निशाणा, काय म्हणाले पहा

संगमनेरचे राजकीय वातावरण बिघडले; थोरातांचा मंत्री विखेंवर निशाणा, काय म्हणाले पहा

spot_img

संगमनेर | नगर सह्याद्री

तालुक्यात सध्या राजकीय वातावरणात घडत असलेल्या बदलांमुळे एक प्रकारची दहशतीची भावना निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कुणाचीही गुलामगिरी स्वीकारू नका. मतभेद विसरून एकत्र या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ताकदीने लढा, असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणुकीनंतर आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. बाळासाहेब थोरात म्हणाले कारखान्याचे कार्य सहकारमहर्षींच्या शिस्त, पारदर्शकता आणि विचारांवर आधारित आहे. निवडणुकीपूर्वी अफवा पसरल्या, पण सभासदांनी एकमताने निर्णय घेतला आणि तो फुगा फुटला.त्यांनी संगमनेरच्या राजकीय संस्कृतीचं कौतुक करताना बंधूभाव, शिस्त आणि एकतेचा आदर्श मांडला.

ते पुढे म्हणाले की, प्रत्येक हंगाम नवीन आव्हाने घेऊन येतो आणि काही प्रश्न हे केंद्र सरकारशी निगडित असतात. आपण एकजुटीने त्यांना सामोरे जावे लागेल. संगमनेरची खास राजकीय ओळख अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांवर आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी ठामपणे सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...