spot_img
अहमदनगरसंदेश कार्ले यांचे पारनेरबाबत मोठे विधान; मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी...

संदेश कार्ले यांचे पारनेरबाबत मोठे विधान; मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी…

spot_img

संदेश कार्ले यांचा पारनेर तालुक्यात प्रचार दौरा / पारनेरमधील पाणी योजना सक्षमपणे चालवुन दाखवु

पारनेर / नगर सह्याद्री :
नगर तालुक्यातील घोसपुरी पाणी योजना सक्षमपणे चालवुन नफ्यात आणली. पारनेर मधील ग्रामीण भागातील पाणी योजना सक्षमपणे चालवुन दाखवणार आहे. पाण्यावर असणारी पुणे जिल्ह्याची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी सर्वात पुढे मी असणार असे प्रतिपादन पारनेर -नगर मधील अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांनी केले.

कार्ले यांनी कान्हुर पठार व आसपासच्या गावात जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. यावेळी मतदारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, पाणी योजना चालवता न आल्याने ग्रामीण भागातील पाणी योजना बंद पडत आहेत. मी नगर तालुक्यातील घोसपुरी पाणी योजना नऊ वर्ष चालवुन दाखवली. हि योजना नफ्यात आणली .पारनेर तालुक्यातील मतदारांनी साथ दिल्यास येथील सर्व पाणी योजना सक्षमपणे चालवुन दाखवेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वात जास्त आंदोलन करण्याचे काम केले. यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला. सरकारकडुन शेतकऱ्यांसाठी भरपुर योजना असुनही शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच आहे.

त्या योजना प्रभावी पणे चालवणारी यत्रंणा सक्षम नसल्यानेच शेतकऱ्यांना कसलाच लाभ मिळत नाही से सांगुन कार्ले म्हणाले की, मला शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत कळकळ आहे. माझ्या सारखा चळवळ करणारा कार्यकर्ता निवडणुकीत उभा राहिला नाही तर सर्वसामान्यांचे नेतृत्व कसे तयार होईल. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी माझा लढा कायम राहणार आहे. पाण्याबाबत पुणे जिल्हयाची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी पारनेर तालुक्यातील जनतेने साथ देण्याचे आवाहन कार्ले यांनी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विधानसभा निकालानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Manoj Jarange Patil News : अरे आम्ही मैदानातच नाहीत. तरी तुम्ही आम्हाला फेल झाला...

तुमचे व्हॉट्सॲप कुठे कुठे आहे चालू? या युक्तीने कळेल क्षणार्धात

नगर सहयाद्री वेब टीम :- WhatsApp हे एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे, जे प्रत्येकजण...

महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजणार; लवकरच मोठा निर्णय होणार?

Politics News: राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारून महाविकास आघाडीला धूर चारत पुन्हा...

राज्याला मिळाला सर्वात कमी वयाचा आमदार; रोहित पाटलांचा दणदणीत विजय

Politics News: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती...