अहमदनगर | नगर सह्याद्री
उच्च तंत्रज्ञान, उत्कृष्ट वैद्यकीय उपचारासोबतच सर्व सुविधा आणि स्वच्छता यामुळे अवघ्या ५ वर्षात साईदीप हॉस्पिटलचा राज्यात नावलौकिक झाला. नगर मध्ये वैद्यकीय सेवा क्षेत्राचे मोठे नेटवर्क आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.
साईदीप हॉस्पिटलच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन भवन येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. यावेळी साईदीप हॉस्पिटलचे चेअरमन डॉ दीपक एस. एस., डॉ. आर. आर. धूत, डॉ.शामसुंदर केकडे, डॉ. रवींद्र सोमाणी, डॉ. निसार शेख, डॉ व्ही एन देशपांडे, डॉ. हरमीत कथुरिया, डॉ.अनिल कुर्हाडे, डॉ.ज्योती दीपक, डॉ. संगीता कुलकर्णी, डॉ.किरण दीपक, डॉ. वैशाली किरण, डॉ.राहुल धूत, डॉ. इबाल शेख, डॉ.पायल धूत यांच्यासह संचालक मंडळ सदस्य यावेळी उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना डॉ. आर.आर. धूत यांनी महात्मा ज्योतीराव फुले योजने अंतर्गत जिल्ह्यातील अनेक रुग्णांना वातानुकूलीत हॉस्पिटल मध्ये मोफत उपचार मिळाले. आणखी बेडची संख्या वाढवण्यासाठी आम्ही पुढे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना साईदीप हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. दीपक म्हणाले, मला माझे सहकारी संचालक यांच्यामुळे बळ मिळाले आणि माझे कर्मचारी, सहकारी डॉटर्स यांच्या पाठबळामुळे अल्पवधित साईदीप हॉस्पिटलची प्रगती करू शकलो. आणखी नवीन तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर करून साईदीप हॉस्पिटलचा विस्तार आम्ही करणार आहोत. ज्यामुळे बेड संख्या वाढेल आणि वैद्यकीय सेवा सुविधाही वाढतील आणि आणखी प्रगत तंत्रज्ञान वापरून उपचार पद्धती सोपी होईल असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी सालीमठ यांनी नगरमध्ये प्रत्येक रोड वर हॉस्पिटल आहे आणि प्रत्येक अंतर्गत रस्त्यावर डिस्पेंसरी किंवा छोटे हॉस्पिटल आहे. नगर हे एक मेडिकल हब बनले आहे. यासाठी जिल्ह्याच्या विकास आराखडा तयार करताना वैद्यकीय क्षेत्राची व्याप्ती वाढण्यासाठी आवश्यकती उपाययोजना जरूर केली जाईल आणि जसे डॉ. दीपक यांनी सांगितल्याप्रमाणे नगरला विमानतळ होण्यासाठी आवशक ते प्रयत्न जरूर केले जातील अशी ग्वाही दिली.
अचूक निदान, योग्य उपचार आणि ते ही एकाच छताखाली उपलब्ध केल्या
Your message has been sent
ने रुग्णांना इतर मोठ्या शहरात जाऊन उपचार घेण्यासाठी लागणार्या वेळेत आणि पैशाची बचत झाली. आधुनिक तंत्रज्ञान आणि सर्व सेवा सुविधा यामुळे रुग्णांनी डॉ. दीपक यांच्या उपचारामुळे कसे बरे झालो ते येथे समक्ष सांगितले. कार्यक्रमात आभार डॉ. रवींद्र सोमाणी यांनी तर सूत्रसंचालन प्रा. प्रसाद बेडेकर यांनी केले. या वेळी अनेक रुग्णांसहित सामाजिक, राजकीय, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती, साईदीप हॉस्पिटलचे अधिकारी, डॉटर्स, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.