spot_img
महाराष्ट्रToday Accident News: साईदर्शनाची ओढ अधुरी राहिली! भीषण अपघात चार ठार, कंटेनर...

Today Accident News: साईदर्शनाची ओढ अधुरी राहिली! भीषण अपघात चार ठार, कंटेनर चालक फरार

spot_img

सोलापूर। नगर सहयाद्री-
साईंच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात होऊन चौघे ठार झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिला आहेत. बुधवारी (दि. २७) पहाटे करमाळा तालुयातील पांडे गावानजिक कंटेनर आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात चारचाकी वाहनातील आठपैकी तीघांचा जागीच मृत्यू झाला.

करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना एक दगावला आहे. मृत भाविक कर्नाटक राज्यातील आहेत. श्रीशैल चंदेशा कुंभार (वय ५६), शशिकला श्रीशैल कुंभार (वय ५०, रा. गुलबर्गा), ज्योती दिपक हिरेमठ (वय ३८, रा. बागलकोट) यांचा जागीच मृत्यू झाला. शारदा दीपक हिरेमठ (वय ७०, रा. हुबळी) यांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील गुलबर्गा येथील भाविक साईच्या दर्शनासाठी निघाले होते. करमाळा तालुयातील सालसेकडून तवेरा गाडीने (क्र. केए ३२, एन ०६३१) शिर्डी येथे दर्शनासाठी निघाले होते. कंटेनर (क्र. आरजे ०६ जीसी २४८६) हा फरशी घेऊन करमाळ्याकडून सालसेच्या दिशेने निघाला होता.

पहाटे सहाच्या सुमारास पांडे गावच्या पुलाजवळील वळणावर या वाहनांची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला. जोराचा आवाज झाल्याने पांडे गावातील युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले. या अपघातात आठ महिन्यांचा चिमुकला सुखरूप बचावला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

गणेशोत्सव: कार्यकर्ता घडविणारा अखंड कारखाना राहिलाय का!

समाजकारण-राजकारणाचे बाळकडू मिळणारा मंडप जुगारी अड्डा अन् गुंड- मवाल्यांच्या ताब्यात गेल्याचं बाप्पाला दु:ख! ‘जय...

अहमदनगर जिल्हा बँकेत मोठी नोकर भरती; ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु…

अहमदनगर / नगर सह्याद्री - जिल्हा सहकारी बँकेत संचालक मंडळाच्या मान्यतेने सुमारे 700 पदांसाठी...

‘मराठा समाजाला झुलवत ठेऊन राजकारणाची पोळी भाजू नका’

आमदार राजेंद्र राऊतांचा मनोज जरांगेंना टोला सोलापूर | नगर सह्याद्री स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी कोणीही मराठा...

विधानसभा निवडणूक; नव्या सर्व्हेच्या अंदाजाने मविआची चिंता वाढली; काय आहे अंदाज पहा

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. यंदा कुणाची...