spot_img
ब्रेकिंगMaratha Reservation:पुण्यात धडकणार भगवे वादळ!! 'हे' महामार्ग वाहतुकीसाठी बंद

Maratha Reservation:पुण्यात धडकणार भगवे वादळ!! ‘हे’ महामार्ग वाहतुकीसाठी बंद

spot_img

पुणे। नगर सहयाद्री
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेल्या महामोर्चाचे आज पुण्यात आगमन होणार आहे. पुण्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे.

जालना, बीड, आणि नगरची शिव ओलांडून आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी लाखो मराठ्यांसह आपला महामोर्चा पुण्याच्या दिशेने वळवला आहे.

आज दुपारच्या जेवणाची व्यवस्था भीमा कोरेगाव येथे करण्यात आली आहे. तर, आजचा मुक्काम पुणे जिल्ह्यातील चंदननगर येथे केला जाणार आहे.

महामोर्च्याच्या पाश्ववभूमीवर पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पुण्यातून नगरकडे जाणारी वाहतूक आज सकाळी सहा वाजल्यापासून बंद आहे. पुणे शहरातून नगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने खराडी बायपास वरून वळण घेत मगरपट्टा चौकातून सोलापूर रस्त्याने वळवण्यात आली आहे. मुंबई-पुणे रस्त्यावरील वाहनांना भोसरी, चाकण, शिक्रापूरमार्गे जावे लागणार असून अनेक मुख्य रस्ते आज वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्यात पुन्हा सैराट! बहिणीच्या बॉयफ्रेंडला आई अन् भावाने संपवलं

पुणे । नगर सहयाद्री :- पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बहिणीच्या बॉयफ्रेंडचा...

‘पुढील आठवड्यात सरपंच आरक्षण सोडत’

महिला आरक्षण उपविभागीय, तर सर्वसाधारण अन्य प्रवर्गाचे तहसील पातळीवर काढणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री ग्रामविकास विभागाने...

फडणवीस सरकारचा ‘मोठा’ निर्णय; अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार

गैरप्रकार सहन केला जाणार नाही: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई | नगर सह्याद्री रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच...

फलक लावणे गैर काय? ते माझे काका!; आमदार रोहित पवारांनी भूमिका केली जाहीर

कर्जत । नगर सहयाद्री:- कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर...