spot_img
अहमदनगरAhmednaga: दोन दिवस संत्ततधार!! कांदा पिकाचे 'मोठे' नुकसान...

Ahmednaga: दोन दिवस संत्ततधार!! कांदा पिकाचे ‘मोठे’ नुकसान…

spot_img

सुपा /शरद रसाळ
मंगळवार व बुधवार सलग दोन पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात संततधार पाऊस पडल्याने जनजीवन ठप्प झाले असून कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जानेवारी महिन्यात गहू ज्वारी ही पिके दाणा भरणीत आसतात तर काही कांदा पिके काढनीला असतात अशात दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणा नंतर मंगळवारी व बुधवारी सकाळी सुपा परिसरा सह पारनेर तालुक्यातील अनेक गावात पावसास सुरुवात झाली. शेतातील जे पिके पाण्यावर आहेत त्यांना हा पाऊस फलदायी असला तरी काढणीला आलेल्या पिकांना हा पाऊस त्रास दायक आहे.

जानेवारीत पडणारा हा अवकाळी पाऊस काही शेतमालाला फलदायी असला तरी काही पिकांना मात्र मारक आहे. या पावसानंतर भाजीपाला पिके, फुल शेती व नगदी पिकाचे मोठे नुकसान होईल, त्यातच थोडेफार वादळ आले तर ज्वारी पिक सपाट होण्यास वेळ लागणार नाही. पाऊस लांबला किंवा सुर्यदर्शन नाही झाले तर पिकांचे अस्तित्व धोक्यात येईल यात मात्र शंका नाही.

बुधवारी पावसाने हजेरी लावल्याने सुपा येथील आठवडे बाजारात खरेदी व विक्री करणारांची एकच धांदल उडाली होती. पावसामुळे शाळकरी मुलांसह पालकांची शिक्षकांचीही चांगलीच धावपळ उडवली. तर काढणीला आलेला कांदा सलग दोन दिवस शेतातच भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...