spot_img
अहमदनगरकेडगावात राडा! तरुणावर अचानक हल्ला; परिसर हादरला..

केडगावात राडा! तरुणावर अचानक हल्ला; परिसर हादरला..

spot_img

अहिल्यानगर। नगर सहयाद्री
केडगाव परिसरातील दिपनगर येथे एका तरूणाला काही कारण नसताना सहा जणांनी एकत्र येऊन मारहाण केली. अविनाश अशोक भिंगारदिवे (वय 25 रा. दिपनगर, केडगाव) असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदेश क्षेत्रे, सुमित शिंदे, रोहन क्षेत्रे, अमित शिंदे, मंगेश कांबळे व अनिकेत घोडके (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. दिपनगर, केडगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (6 एप्रिल) रात्री 11.45 वाजेच्या सुमारास अविनाश दिपनगर येथून आपल्या घरी जात असताना ही घटना घडली.

अविनाश यांनी सांगितले की, दिपनगर परिसरात संशयित सहा जण हातात लाकडी दांडे व गज घेऊन आरडाओरड करत उभे होते. मी काय झाले आहे हे पाहण्यासाठी थांबलो असता त्यांनी मला विचारले की, इथे का थांबलास? तुझे काय काम आहे? मी त्यांना सांगितले की, माझे काही काम नाही. एवढ्यावरून त्यांनी मला शिवीगाळ करत अचानक मारहाण सुरू केली.

रोहन क्षेत्रे याने लाकडी दांडक्याने, इतरांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. मी मोठ्याने आरडाओरड केल्यावर संशयित आरोपींनी तेथून पळ काढला, असे भिंगारदिवे यांनी सांगितले. घटनेनंतर त्यांनी आपल्या भावास संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर ते कोतवाली पोलीस ठाण्यात गेले व फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हिंदू संकृतीला डळमळीत करणार्‍या वोकिझम संकटाला समजून घ्या; शिवशंभू व्याख्याते नीलेश भिसे

उत्कृष्ट आरास स्पर्धेत सिद्धेश्वर तरुण मंडळ व समर्थ युवा प्रतिष्ठान प्रथम अहिल्यानगर | नगर सह्याद्री आता...

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पाणीपुरीवाल्याला मारहाण, नगरमध्ये ‘येथे’ घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील दिल्लीगेट परिसरात पाणीपुरी विक्रेत्याने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग...

चास घाटात दरोडा!; ‘ती’ टोळी पकडली

चास घाटाजवळील घटना; सात लाख ९० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे...

धक्कादायक! नाशिकमध्ये गावगुंडांकडून पत्रकारांना बेदम मारहाण

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये पत्रकारांना गावगुंडानी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर...