spot_img
अहमदनगरअरुणकाका जगताप यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी श्री विशाल गणपतीला साकडे

अरुणकाका जगताप यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी श्री विशाल गणपतीला साकडे

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात मंगळवारी सकाळी महाआरती करण्यात आली. अरुणकाका बरे होवून सुखरुप शहरात परतावे यासाठी श्री विशाल गणेशाला साकडे घालण्यात आले.

या आरतीसाठी श्री विशाल गणपती देवस्थानचे विश्वस्त प्रा. माणिक विधाते, माजी नगरसेवक संजय चोपडा, विजय गव्हाळे, मनोज कोतकर, मोहन (तात्या) कदम, दीपक सूळ, अमित खामकर, संजय सपकाळ, सुरेश बनसोडे, दीपक खेडकर, आनंद लहामगे, गजेंद्र भांडवलकर, भरत गारुडकर, निलेश बांगरे, संभाजी पवार, अमोल कांडेकर, निलेश इंगळे, राजू पडोळे, प्रभाकर इंगळे, अजय दिघे, बजरंग भुतारे, जालिंदर बोरुडे, पंडितराव खरपुडे, राजू कचरे, माऊली (मामा) गायकवाड, संजय मोरे, अनिल निकम, बाळासाहेब भुजबळ, प्रा. अरविंद शिंदे, माजी नगरसेविका मीनाताई चोपडा, आशाताई निंबाळकर, रेशमा आठरे, रेणुका पुंड, अरुणा गोयल, अलकाताई मुंदडा, स्मिता वाल्हेकर, अंबिका भिसे, उद्धव शिंदे, विशाल बेलपवार, शिवम भंडारी, मेजर गारुडकर, महेंद्र हिंगे, दिपक दरेकर, सर्जेराव तोरडमल, प्रा. भगवान काटे, अनिल निकम, विलास शिंदे, आनंद पुंड, किरण जावळे, संतोष हजारे, अनिकेत येमूल, लहू कराळे, विवेक गायकवाड, अभिजीत सपकाळ, मनीष फुलडहाळे, धर्मा करांडे, लकी खुबचंदानी, अक्षय घोरपडे, अरुण खिची, सुरज शहाणे, ओम पांडे, निलेश इंगळे, गजानन ससाणे, युवराज शिंदे, शैलेश अष्टेकर, सुजाता कदम, तुषार टाक आदींसह नगरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्यांचा प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात महाआरती पार पडली. यावेळी सर्व भाविकांनी मनोभावे अरुणकाकांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी श्री विशाल गणेशाला साकडे घातले.प्रा. माणिक विधाते म्हणाले की, श्री विशाल गणपती हे जागृक देवस्थान असून, सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात.

अरुणकाका बरे व्हावे ही सर्व नगरकरांच्या मनातील इच्छा आहे. सर्व समाज, जाती-धर्मातील लोकांशी काकांचे घनिष्ठ संबंध आहेत. मोठ्या प्रमाणात त्यांनी आपल्या कार्यातून माणसे जोडली असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्व जाती-धर्माचे लोक प्रार्थना करत आहेत. लवकरच ते बरे होऊन परत शहरात यावे, ही सर्वांची मनापासून इच्छा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...