spot_img
देशरोहितच्या अर्धशतकानं रचला पाया, गिल-जुरेलने चढवला विजयी कळस

रोहितच्या अर्धशतकानं रचला पाया, गिल-जुरेलने चढवला विजयी कळस

spot_img

नवी दिल्ली | वृत्तसंस्था
भारत – इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना रांचीमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी १९२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने विजय मिळवला. दरम्यान या विजयासह भारतीय संघाने कसोटी मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे.

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. सामन्याच्या तिसर्‍या दिवशी रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने मिळून ४० धावा जोडल्या. रोहित शर्मा २४ तर यशस्वी जयस्वाल १६ धावांवर नाबाद परतला. चौथ्या दिवशी दोघांनी चांगली सुरुवात केली.

मात्र यशस्वी जयस्वालच्या रुपात भारतीय संघाला पहिला मोठा धक्का बसला. अर्धशतक झळकावल्यानंतर रोहितनेही पॅव्हेलियनची वाट धरली. त्यानंतर भारतीय डाव गडगडल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्मानंतर रजत पाटिदारही परतला. गिल आणि जडेजाने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. जडेजा बाद होताच सरफराज खानही खात न खोलता परतल्याने टीम इंडियावर दडपणही आले. मात्र उर्वरित खेळाडूंनी डाव सावरत विजय संपादन केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सिस्पे विरोधात ठेवीदार आक्रमक; पाच दिवसात पैसे जमा न झाल्यास…, काय दिलाय इशारा पहा

  पारनेर / नगर सह्याद्री- पारनेर, सुपा परिसरातील सुमारे चारशे कोटी रूपयांना गंडा घालणाऱ्या 'सिस्पे कंपनी'...

नगरसेवकाची आरोग्य अधिकाऱ्यास दमबाजी; मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले असून संबंधितांवर कारवाई करावी - सचिव...

कामात अडथळा, जीव मारणे प्रकरणी नगरसेवक कोतकर, बोराटेंवर एफआयआर, काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बाबूराव राजुरकर यांच्या तक्रारीवरून नगरसेवक...

आमदार माजलेत….; विधानसभेत फडणवीस संतापले, काय घडलं जाणून घ्या

मुंबई / नगर सह्याद्री - विधानभवनात गुरुवारी झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण विधिमंडळाच्या प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं...