spot_img
अहमदनगरअण्णा हजारेंना रोहित पवारांचे उत्तर, म्हणाले...

अण्णा हजारेंना रोहित पवारांचे उत्तर, म्हणाले…

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी एका मुलाखतीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना लक्ष केले होते. त्यावर अण्णा हजारे यांनी १०-१२ वर्षांनी जाग आली असल्याचे सांगत माझ्यामुळे तुमचे काही मंत्री घरी गेले होते असे म्हटले होते. त्यावर आता यामध्ये उडी घेत अण्णा हजारे यांना टोला लगावला आहे.

स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर गायब झाले, असं वक्तव्य करत रोहित पवार यांनी अण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अण्णा हजारेंनी पवारांवर केलेल्या टीकेवर बोलताना रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. तर गांधीवादाचा मुखवटा लावून भावनांशी खेळणे योग्य नाही, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

रोहित पवार यांनी पुढे असेही म्हटले, २०१४ पूर्वी प्रत्येक विषयावर आंदोलन करणारे, प्रतिक्रिया देणारे तथाकथित स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर मात्र एवढ्या मोठ्या घडामोडी घडत असताना शांतच राहिले नाहीतर गायब झालेत. शरद पवारांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अण्ण हजारेंना लक्ष्य केलं होते. त्यावर अण्णा हजारे म्हणाले, शरद पवार यांना १०-१२ वर्षांनी जाग आली आहे. त्यांना अचानक जाग कशी आली मला माहिती नाही.

त्यावेळी मी केलेल्या आंदोलनामुळे शरद पवार यांचे अनेक मंत्री घरी गेले होते, कदाचित त्याचा राग त्यांना असावा. म्हणून त्यांनी माझ्यावर टीका केली, असं प्रत्युत्तर अण्णा हजारे यांनी दिलं होतं. रोहित पवार यांनी आता अण्णा हजारे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. त्यावर राज्यभरात टिकेची झोंड उठली आहे. आता अण्णा हजारे काय बोलता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...