अहमदनगर । नगर सहयाद्री-
राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक बातमी समोर आली आहे. आमदार रोहित पवार यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून बुधवारी दि. २४ जानेवारी रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहावे, असं समन्समध्ये म्हटलं आहे.
बारामती अॅग्रो लिमिटेड हा एक उद्योग समूह आहे. रोहित पवार बारामती अॅग्रोचे सीईओ आहेत. पशू खाद्य हे बारामती अॅग्रोचं मुख्य प्रोडक्ट आहे. ईडीने १५ दिवसांपूर्वीच बारामती अॅग्रोवर छापेमारी केली होती.
यामध्ये बारामती अॅग्रोच्या पुणे आणि बारामती येथील कार्यालयांचादेखील समावेश होता. ईडीकडून कागदपत्रांची छाननी करण्यात आली होती. त्यानंतर आता रोहित पवार यांना ईडीचं समन्स बजावण्यात आलं आहे.