spot_img
महाराष्ट्ररोहित पवार यांची सुजित झावरे यांसोबत नवी खेळी? आ. लंके यांना शह...

रोहित पवार यांची सुजित झावरे यांसोबत नवी खेळी? आ. लंके यांना शह देण्यासाठी मोठी राजकीय गुगली, पहा काय घडतंय

spot_img

अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण दक्षिण आणि उत्तर मध्ये विभागल आहे. सध्या दक्षिणेतील राजकारण नेहमीच चर्चेत येतय. सध्या पारनेर व ओघानेच आ.लंके यांचं राजकीय अस्तित्व कस असणार यावर चर्चा सुरू आहे. याच कारण बदलत राजकीय समीकरण. त्यातच आज मोठ्या राजकीय घडामोडी घडल्यात.

आ.रोहित पवारांची राजकीय गुगली
सध्या शरद पवार गटाची धुरा वाहणारे आमदार रोहित पवार यांनी आमदार नीलेश लंके यांच्या पारनेरमध्ये महिलांसाठी भाऊबीजेच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. विशेष म्हणजे या कार्यक्रमानिमित्त तालुक्यातील महिलांना एकत्र करण्याचे काम पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी अर्थात आ.निलेश लंके यांचे सध्याचे कट्टर राजकीय वैरी यांकडे होते. त्यामुळं सर्वांनीच तोंडात बोटे घातली. त्यानंतर त्यांनी भेट घेतली सुजित झावरे यांची. तेथे जात त्यांनी दिवाळी फराळ घेतले.
रोहित पवार यांची ही राजकीय गुगली मानली जात आहे.

लंके यांना शह देण्यासाठी खेळी
अजित पवार हे राष्ट्रवादीत बंड करून भाजप सोबत गेले. आमदार नीलेश लंके हे देखील शरद पवार गटाची साथ सोडत अजित दादांसोबत गेले. आ.लंके यांची लोकप्रियता पाहता मोठ्या पवार साहेबांनी किंवा आ. रोहित पवार यांनीही त्यांना थेट विरोध केला नाही. पण आता विजय औटी यांना सोबत घेत व सुजित झावरे यांची भेट घेत लंके यांना शह देण्यासाठी आ. रोहित पवार यांनी खेळी सुरू केली असल्याची चर्चा आहे.

सुजित झावरेही राजकीय अस्तित्वाच्या शोधात
सुजित झावरे देखील राजकीय बस्तान बसवण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यामुळे त्यांनी देखील पाठीमागे मोठ्या पवार साहेबांची भेट घेतली होती. आणि आज रोहित पवार यांनी सुजीत झावरे यांची घेतलेली भेट व सुजित झावरे यांची पडद्यामागून सुरू असणाऱ्या हालचाली या सुजित झावरे राजकीय अस्तित्वाच्या शोधात असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे आता पवार व झावरे भेट राजकीय वातावरणात चर्चेचा विषय ठरली आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

गुरुवार ‘या’ राशींच्या लोकांसाठी भरभराटीचा, तुमची रास काय? पहा

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत अविश्वसनीय असा...

जी. एस. महानगर बँक निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार, मोठी माहिती समोर..

पारनेर | नगर सह्याद्री जी एस महानगर बँकेची निवडणूक लवकरच होणार असून यासाठी मतदारांची नवीन...

मनपाचे 1680 कोटींचे बजेट मंजूर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिकेचा सन 2024-2025 चा सुधारीत व सन 2025-2026 चा मूळ...

स्मशानभूमी परिसरात थाटला ‘ऑक्सिजन पार्क‌‌‌’; नगर जिल्ह्यातील ‘या’ गावाची चर्चा!

वृक्षप्रेमी रसाळ बंधु यांचे कार्य कौतुकास्पद: आमदार काशिनाथ दाते पारनेर । नगर सहयाद्री:- निसर्गाच्या सान्निध्यात वृक्ष...