spot_img
ब्रेकिंगघड्याळ पण जाईल, पुढे 'ती' वेळ येईल! रोहित पवार यांचा अजित पवार...

घड्याळ पण जाईल, पुढे ‘ती’ वेळ येईल! रोहित पवार यांचा अजित पवार यांच्यावर निशाणा, व्हायरल ट्विट मध्ये नेमकं काय? पहा..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
पक्षचिन्ह आणि पक्षनावा संदर्भात शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयानं शरद पवार गटाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी ‘तुतारीवाला माणूस’ हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिलीय. तर अजित पवारांनाही घड्याळाबाबत इशारा दिला. यावरून आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि पक्ष चिन्ह (घड्याळ) अजित पवार गटाला दिलं होतं. त्यानंतर पक्षचिन्ह आणि पक्षनावा संदर्भात शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पार पडलेलया सुनावणीत न्यायालयानं महाराष्ट्र निवडणूक आयोगाला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी ‘तुतारीवाला माणूस’ आणि पक्षाचं नाव राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

तर, अजित पवार गटाने मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांमध्ये नोटीस जारी करून त्यामध्ये सर्व प्रचारांच्या जाहीरातींमध्ये पक्षनाव आणि पक्ष चिन्हाबाबतचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं नमूद करावं, असेही निर्देश अजित पवार गटाला देण्यात आले आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं घड्याळ चिन्ह मात्र न्यायालयाच्या अंतिम निकालानंतरच वापरायचं किंवा नाही ते ठरणार आहे. त्यामुळे घड्याळ चिन्ह वापरण्याबाबत अजित पवार यांच्यावर कोर्टाच्या निकालाची टांगती तलवार असणार आहे. यावरून रोहित पवार गटाने अजित पवार गटावर ट्विट करत हल्लाबोल केला आहे.

रोहित पवार यांच्या ट्विट मध्ये नेमकं काय?
निवेदनातील पहिलं वाक्य खरं असलं तरी लाल चौकटीतील अर्ध वाक्य अधिक सत्य आहे. कारण अंतिम निकालात न्यायालयाने परवानगी दिली तरच घड्याळ चिन्ह पुढे वापरता येईल, अन्यथा घड्याळ तर जाईलच पण वेळ कशी येईल याचा अंदाज लोकांचा विरोध बघता आजच येतोय. राजकारणाला अशा अटी लागू होत असतील तर याचं दुःख वाटतं. पण विचार बदलल्यामुळे आणि ज्याचं राजकारणच विरोधी पक्षाला संपवण्याच्या अटीवर चालतं त्यांच्यासोबत गेल्याने ही वेळ आली, हे नाकारता येणार नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नुकसानीचे तातडीने पंचनामे करा: आ. काशिनाथ दाते, खडकवाडीत नुकसानग्रस्त पिकांची केली पाहणी..

पारनेर | नगर सह्याद्री तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे....

सोन्याचे दागिने पश्चिम बंगालमधून जप्त; बंगाली कारागीरासह साथीदाराला अटक, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर शहरातील गंजबाजार येथील सोन्याच्या दुकानातून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने...

मनपा प्रारूप प्रभाग रचना हरकतींवर शुक्रवारी सुनावणी

अहिल्यानगर । नगर सह्याद्री राज्य शासनाच्या आदेशानुसार आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग...

मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेला ‌‘सर्वोत्कृष्ट बँक‌’ पुरस्कार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड, मुंबई यांच्या वतीने...