spot_img
राजकारणRohit Pawar ED Chaukashi : रोहित पवार ईडीच्या कार्यालयात दाखल, ईडी कार्यालयाबाहेर...

Rohit Pawar ED Chaukashi : रोहित पवार ईडीच्या कार्यालयात दाखल, ईडी कार्यालयाबाहेर समर्थकांची जोरदार घोषणाबाजी

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची आज (२४ जानेवारी) ईडी चौकशी होणार आहे. या चौकशीसाठी ते कार्यलयात दाखल झाले आहेत. बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणी त्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यापूर्वी ते सकाळी हॉटेल ट्रायडेंट मधून विधिमंडळात गेले आणि तेथे थोर पुरुषांच्या फोटोला अभिवादन केले. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले. तेथे त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांची तसेच अनेक कार्यकर्त्यांची भेट घेतली. तेथून ते ईडी कार्यालयात चौकशी साठी रवाना झाले. सुप्रिया सुळेही त्यांच्यासोबत आहेत.

रोहित पवार हे एकटे नाहीत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले. जामखेड, बारामती, पुणे येथून हजारो कार्यकर्ते काल रात्रीपासन मुंबईत दाखल असून त्यांनी रोहित पवार यांच्या समर्थनार्थ विविध घोषणा दिल्या.’एकच वादा रोहित दादा’ अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी रोहित पवरा यांना पाठिंबा दर्शवला. एवढेच नव्हे तर बलार्ड पियर परिसरात ठिकठिकाणी रोहित पवारांसाठी बॅनर लावण्यात आले. ‘पळणारा नाही तर लढणारा दादा ‘ असे बॅनर वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आले. तसेच ईडी कार्यालय परिसरात दडपशाहीच्या कारवाईचा निषेध असे लिहिलेले बॅनरही लावण्यात आले.

ईडी कार्यालयात नुसतंच बसवून ठेवलं तर काय करणार?
“आम्ही सर्व प्रकारची माहिती सीआयडी, इओडब्ल्यू, ईडीला दिली आहे. त्यांनी पुन्हा तीच माहिती मागवली आहे. त्यामुळे ती माहिती परत घेऊन मी ईडी कार्यालयात जाणार आहे. चौकशीदरम्यान काय होईल याची मानसिक तयारी करण्याची गरज नाही. त्यांच्या कार्यालयात त्यांच्याप्रमाणेच कारवाई होणार याची मला कल्पना आहे. चूक केली नसेल तर घाबरायचं कारण काय? त्यांनी मला नुसतंच बसवून ठेवलं तर मला मोकळा वेळ मिळेल आणि त्या वेळेत मी सरकार विरोधात कशापद्धतीने रणनिती आखायची याबाबत विचार करेन. आणि चौकशी संपल्यानंतर शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीच्या मार्गाने लढण्यासाठी मी कायम तयार असेन,” असे उत्तर त्यांनी दिले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशीतील जातकांना लाभदायक ‘गुरुवार’

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य खूप अल्पसे अडथळे येतील-परंतु दिवसभरात खूप काही यश...

नगर शहरातील तीन समाजकंटक हद्दपार; वाचा नगर क्राईम

​अहिल्यानगर । नगर सह्याद्री ​अहिल्यानगर शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कोतवाली...

जिल्हा बँक सोनेतारण व्यवसाय वाढवणार : चेअरमन चंद्रशेखर घुले

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोनेतारण व्यवसायात वाढ करणार...

सामूहिक आत्महत्येने नाशिक हादरले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने २ मुलांसह विहिरीत मारली उडी

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना...