अहमदनगर । नगर सहयाद्री
शहरातील लिंक रोड परिसरामध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने जेरबंद केले असून अंधाराचा फायदा घेवुन दोन साथीदार फरार झाले आहे.ओसवाल इंपिरियअल चव्हाण ( वय 28 वर्षे, रा. वाळुंज पारगांव, ता. जि. अहमदनगर) डेग विठ्ठल भोसले ( वय 29 वर्षे, रा. आनंद चिखली, ता. आष्टी, जि. बीड, हल्ली रा. वाळुंज पारगांव, ता. जि. अहमदनगर) तुषार उर्फ नुटल्या इंपिरिअल भोसले ( वय 33 वर्षे, रा. वाळुंज पारगांव, ता. जि. अहमदनगर ) नागेश रेजा काळे ( वय 25 वर्षे, रा. वाळुंज पारगांव, ता. जि. अहमदनगर ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव असून त्याचे दोन साथीदार अजय विलास चव्हाण ( रा. हातवळण, ता. आष्टी ), कान्ह्या उर्फ कानिफ उध्दव काळे ( पत्ता माहित नाही ) हे फरार झाले आहे.
त्यांच्या ताब्यातून तलवार, सुरा, लोखंडी कटावणी, मिरचीपुड, दोन महागडे मोबाईल, दोन मोटारसायकल असा एकुण 2 लाख 12 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या सर्व आरोपीवर यापूर्वी खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
अधिक माहिती अशी की, पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील गंभीर स्वरुपाचे घडलेले गुन्हे उघडकिस आणण्याबाबत आदेश दिले होते. आरोपींची माहिती काढत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की सराईत गुन्हेगार ओसवाल इंपिरियल चव्हाण (रा. वाळुंज पारगांव, ता. जि. अहमदनगर) हा त्याच्या साथीदारांसह दरोडा घालण्याच्या तयारीने थांबलेले आहेत.
त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोउपनि/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार बबन मखरे, दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, बापुसाहेब फोलाणे, रविंद्र कर्डीले, गणेश भिंगारदे, संदीप दरंदले, संतोष खैरे, विजय ठोंबरे, रविंद्र घुंगासे, रोहित मिसाळ, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर यांच्या पथकास कारवाई करणेबाबत सुचना दिल्या. पथकातील पोलीसांनी मिळालेल्या बातमीनुसार लिंक रोडजवळ असलेल्या ओढ्यालगत काही संशयीत इसम आपसात काहीतरी कुजबुज करीत असल्याचे दिसले.
पथकातील अधिकारी व अंमलदार यांची खात्री पटल्याने सर्वांनी घेराव घालून छापा टाकला. यावेळी त्यांना पोलीस आल्याची चाहुल लागल्याने ते त्यांची वाहने जागीच सोडून पळून जावू लागले. त्यावेळी पथकातील पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन चार जणांना शिताफीने ताब्यात घेतले. तर दोन जण अंधाराचा फायदा घेवून पळुन जाण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी पोहेकॉ संदीप कचरु पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गु.र.नं. 622/2024 भादविक 399, 402 सह आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.