spot_img
अहमदनगररिक्षाचालकांना खुशखबर आ. संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश; 'तो' दंड होणार पूर्ण...

रिक्षाचालकांना खुशखबर आ. संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश; ‘तो’ दंड होणार पूर्ण माफ

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
राज्यातील रिक्षा टॅसी मालवाहतूक वाहन चालकांनी आपल्या वाहनाचा परवाना शुल्क वेळेत न भरल्यास त्यांना प्रतिदिन ५० रुपयांचा दंड लावण्यात येत होता. तो मागे घ्यावा अशी रिक्षाचालकांची मागणी होती. यासाठी आमदार संग्राम जगताप यांंनी पाठपुरावा केल्यानंतर दंड पूर्णपणे माफ करण्यात आला आहे.

रिक्षाचालकांना केला जाणारा ५० रुपयांचा दंड मागे घ्यावा या मागणीसाठी राज्यातील विविध रिक्षा संघटनांनी जिल्हा स्तरावर आंदोलने केली होती. याच पार्श्वभूमीवर नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रिक्षा चालकांचा प्रश्न मांडला होता. त्या पार्श्वभूमीवर गेल्या २८ तारखेला परिवहन सचिव व आयुक्त तसेच अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेतली.

रिक्षाचालक सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांची उपजीविका रिक्षावरच अवलंबून आहे. प्रतिदिन ५० रुपये दंड भरणे म्हणजे रिक्षा टॅसी मालवाहतूक चालकांसाठी हे अन्यायकारक आहे. याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी मांडलेल्या प्रश्नाला यश आले.

मंत्रिमंडळात विषय मांडला असून राज्यमंत्री दादा भुसे यांनी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर याबाबत हा ५० रुपयांचा दंड पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय झाला अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

रिक्षा संयुक्त फेडरेशनच्यावतीने स्वागत
ऑटो रिक्षा फिटनेस दंड शासनाने स्थगित केला या निर्णयाचे जिल्हा ऑटो रिक्षा संयुक्त फेडरेशनच्यावतीने माळीवाडा बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे स्वागत करुन फाटाके फोडण्यात आले. याप्रसंगी फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश घुले, वैभव जगताप, विलास कराळे, दत्ता वामन, बबनराव बारस्कर, समीर कुरेशी, भैय्या पठाण, अशोक चोभे, अशोक औशिकर, लतिफ शेख, बाबा दस्तगिर, बापू दारकुंडे, विष्णू आंबेकर, रवीकिरण वाघ, नासिर खान, किशोर कुलट, अन्वर शेख, सुधाकर साळवे, फैरोज शेख, विजय शेलार, अभय पतंगे आदी उपिस्थत होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर तालुक्यात बिबट्याची भीती; गावांना दिवसा वीज पुरवठा करावा

माजी सभापती अभिलाष घिगे, सरपंच भाऊसाहेब बहिरट यांची महावितरणकडे मागणी सुनील चोभे | नगर सह्याद्री गेल्या...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भिजतं घोंगडं; याचिकेवर ‘या’ तारखेला सुनावणी होणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षणाच्या मर्यादेबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत मोठी...

कांद्याला भावच नाही, शेतकऱ्याने काय केले पहा…

रांधेतील शेतकर्‍याने कांद्याला भाव नसल्याने पीक केले नष्ट पारनेर | नगर सह्याद्री गेल्या वर्षभरात कांद्याला सरकारने...

अजित पवार.. सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय!; महाराष्ट्रात राजकारण तापले, माफीनामा अन कोण काय म्हणाले..

माजी आमदारपुत्राचं उपमुख्यमंत्र्यांना आव्हान; सोलापुरात वातावरण तापलं सोलापूर | नगर सह्याद्री सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुयातील अनगर...