spot_img
अहमदनगरहोमगार्ड यांच्यासाठी आ, तांबे यांचा पुढाकार; सरकारडे केली महत्वाची मागणी

होमगार्ड यांच्यासाठी आ, तांबे यांचा पुढाकार; सरकारडे केली महत्वाची मागणी

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
राज्यात पोलिस कर्मचार्‍यांची संख्या अत्यंत कमी आहे. पोलीस कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्यामुळे राज्यात होमगार्डचा वापर केला जातो. मात्र होमगार्ड जवान अनियमित सेवेत असल्यामुळे जेव्हा गरज असते, तेव्हा काम दिले जाते. त्यामुळे अनेक वर्षापासून होमगार्ड जवानांची मागणी आहे की, किमान १८० दिवस काम मिळाले पाहिजे. जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह चालू शकतो.

होमगार्ड जवानांच्या या मागणी बद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र गृह रक्षक दल (होमगार्ड) जवानांना किमान १८० दिवस काम देण्याचं निर्णय जाहीर केला होता. मात्र अजून या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने तातडीने निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात केली.

राज्यामध्ये कोणताही सण असेल, वाहतुक पोलीसांच्या मदतीसाठी गृहरक्षक दलांतील जवानांना ड्युटी दिली जाते. सध्या पोलीसांना कायदा व सुवव्यवस्था राखण्यात मदत करण्यासाठी या जवानांची मदत घेतली जाते. त्याचबरोबर एखाद्या आरोपीला एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेण्यात किंवा त्यांना वैद्यकीय मदतीसाठी ने-आण करण्यात होमगार्डची मदत होते. राज्यात सध्या ५३ हजार होमगार्ड कार्यरत आहेत.

होमगार्ड जवानांना देखील राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांप्रमाणे सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात केली.

अंमलबजावणी तातडीने करावी
महाराष्ट्रात वेळोवेळी या होमगार्डस जवानांना वर्षभर काम देण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर त्यांना निश्चित वेतन मिळावं यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. सध्या होमगार्ड्सला कोणत्याही प्रकारचे निश्चित वेतन नाही. ज्या दिवशी काम असते, त्याच दिवसाचे पैसे त्यांना मिळतात. इतर दिवशी त्यांना रोजगाराचे दुसरे साधन शोधावे लागत असल्यामुळे होमगार्ड जवानांना १८० दिवस काम देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने केली पाहिजे.
– सत्यजीत तांबे, आमदार

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बा…शनिदेवा घालवणार का तू त्यांचे डोळे!, कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव..

कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव | कोट्यवधी रुपये लुटणारे याच तालुक्यातील | कार्यकर्त्यांना...

अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा! राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण?

मुंबई | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले...

नगर शहरात धक्कादायक प्रकार! महिलेल दिले गुंगीचे औषध अन्…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात एका 42वर्षीय महिलेची गुंगीकारक औषध देऊन शारीरिक छळ आणि आर्थिक...

अपघाताचा थरार! कार कोसळली, काचा फोडून नालेगावातील दोघांनी अशी केली सुटका..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पंपिंग स्टेशन रस्त्यावरील कराळे क्लब हाऊसजवळ शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक...