spot_img
ब्रेकिंग११ वर्षांनी लागला निकाल! डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात कुणाला झाली जन्मठेप? पहा..

११ वर्षांनी लागला निकाल! डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात कुणाला झाली जन्मठेप? पहा..

spot_img

पुणे । नगर स सहयाद्री
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात विशेष न्यायालयाने निकाल दिला आहे. पाचपैकी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी विरेंद्र तावडे, ऍड संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांची न्यायालयानं पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे. दाभोलकर यांची २०१३ मध्ये पुण्यात हत्या झाली होती. त्यांच्या हत्येला पावणे अकरा वर्ष उलटली आहेत.

२० ऑगस्ट २०१३ रोजी अंनिसचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ओमकारेश्वर पुलावर त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एकूण पाच आरोपी होते. सचिन अंदुरे, शरद कळसकर या दोघांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या होत्या.

दोन्ही हल्लेखोरांना न्यायालयानं दोषी धरलं आहे. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.डॉ. विरेंद्र तावडे, ऍड संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या तिघांवर दाभोलकरांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता. पण त्यांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. त्यांच्या विरोधात पुरावे नसल्याचं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं. त्यामुळे दाभोलकर हत्या प्रकरणात हल्लेखोरांना शिक्षा झाली आहे. पण कट रचल्याचा आरोप असणार्‍या तिघांची सुटका झाली आहे.

दाभोलकरांच्या हत्येला नऊ वर्षे उलटल्यानंतर १५ सप्टेंबर २०२१ रोजी पुण्याच्या विशेष न्यायालयाने डॉ. विरेंद्र तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच आरोपींवर आरोप निश्चित केले. या पाचही आरोपींनी गुन्हा कबूल करण्यास नकार दिला. त्यामुळे विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू झाली.

न्यायाधीश नावंदर यांच्या बदलीनंतर विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू झाली.या खटल्यात सीबीआय’तर्फे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी २० साक्षीदारांची साक्ष नोंदवली. तर बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. प्रकाश साळशिंगीकर, अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अ‍ॅड. सुवर्णा आव्हाड यांनी दोन साक्षीदारांची साक्ष नोंदवत सरकार पक्षाच्या साक्षीदारांची उलटतपासणी नोंदवली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...